Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

स्वस्त झाले मोटोरोलाचे हे पॉप्युलर स्मार्टफोन्स, मिळतोय १५,००० रुपयांपर्यंतचा ऑफ

11

नवी दिल्ली: Smartphone Deals: नवीन स्मार्टफोन घेण्याचा विचार करत असाल तर, फ्लिपकार्टच्या मोटो डेज सेलमध्ये तुमच्यासाठी अनेक उत्तम ऑफर्स आहेत. १ फेब्रुवारीपासून सुरु झालेला हा सेल ४ फेब्रुवारीपर्यंत चालेल. या सेलमध्ये तुम्ही MRP पेक्षा खूपच कमी किमतीत Motorola स्मार्टफोन खरेदी करू शकता. खास गोष्ट म्हणजे सेलमध्ये काही स्मार्टफोन्सवर १५ हजार रुपयांपर्यंतची सूट दिली जात आहे. याव्यतिरिक्त, Moto Days सेल दरम्यान, तुम्ही आकर्षक बँक आणि एक्सचेंज ऑफरसह तुमचा आवडता Motorola फोन देखील खरेदी करू शकता.

वाचा: अखेर Samsung Galaxy S23 Series च्या जबरदस्त स्मार्टफोन्सची एंट्री, फीचर्स दमदार ,पाहा किंमत

Motorola Edge 30 Ultra:

कंपनीचा हा फोन २०० मेगापिक्सल कॅमेरासह येतो. त्याच्या 8 GB रॅम आणि 128 GB इंटर्नल स्टोरेज व्हेरियंटची MRP ६९,९९९रुपये आहे. सेलमध्ये, तुम्ही डिस्काउंटनंतर ५४,९९९ रुपयांमध्ये खरेदी करू शकता. Flipkart Axis Bank कार्डने पेमेंट केल्यावर तुम्हाला ५% कॅशबॅक देखील मिळेल. जर तुम्ही एक्सचेंज ऑफरमध्ये फोन घेतला तर, तुम्हाला २० हजार रुपयांपर्यंतचा अधिक फायदा मिळू शकतो. कंपनी फोनमध्ये ६.६७-इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले देत आहे. याशिवाय, २००-मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देखील मिळेल.

वाचा: WhatsApp चे कूल फीचर, ऑटोमॅटिक हाइड होणार Photos-Videos , पाहा सेटिंग्स

Motorola G82 5G:

6 GB रॅम आणि 128 GB इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनची MRP २३,९९९ रुपये आहे. सेलमध्ये, तुम्ही १८,९९९ रुपयांमध्ये २०% सूटसह फोन खरेदी करू शकता. Flipkart Axis Bank कार्डने पैसे देणाऱ्या युजर्सना ५ % कॅशबॅक देखील मिळेल. एक्सचेंज ऑफरमध्ये फोनची किंमत आणखी १७,००० रुपयांनी कमी केली जाऊ शकते. फोनमध्ये ६.६ -इंचाचा फुल HD+ डिस्प्ले आणि ५० मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा मिळेल. कंपनी या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 695 प्रोसेसर देत आहे.

Motorola G31:

हा फोन 4 GB रॅम आणि 64 GB इंटरनल स्टोरेज सह येतो. सेलमध्ये तुम्ही तो १३,९९९ च्या MRP ऐवजी ९९९९ मध्ये खरेदी करू शकता. कंपनी या फोनवर ९४५० रुपयांपर्यंतची एक्सचेंज ऑफरही देत आहे. या फोनमध्ये ६.४ -इंचाचा फुल HD+ डिस्प्ले मिळेल. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस ५० -मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन ५००० mAh बॅटरीसह येतो.

वाचा: Bluetooth डिव्हाइसशी कनेक्ट होत नसेल तर बदला ‘या’ सेटिंग्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.