Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
औरंगाबाद येथील एका महिलेची नांदेड व लातूर येथील विनोद शिंदे, केशव वाघमारे, विलास वडजे, सोमनाथ दापके, सुनील जगवार या पाच जणांसोबत ओळख होती. एका संस्थेच्या माध्यमातून त्यांची ओळख झाली होती. त्यांनी महिलेस १ लाख रुपयांचे ३ लाख रुपये करून देतो, असे अमिष दाखविले. त्यासाठी १० लाख रुपये सोबत घेऊन बुधवारी महिलेने थेट नांदेड गाठले. त्या ठिकाणी उतरल्यानंतर महिला एका वाहनाने औंढा नागनाथकडे निघाली. तर ४० लाख रुपयांच्या बनावट नोटा घेऊन खामगाव येथून पाच जण गाडीने औंढा नागनाथकडे आले होते.
औंढा नागनाथ येथील उपबाजार समितीच्या आवारात महिलेने जवळील १० लाखांच्या नोटा आरोपींना दिल्या. त्या बदल्यास गाडीतील व्यक्तींनी ४० लाखांच्या नोटांची बॅग महिलेकडे दिली. त्यानंतर ते फरार झाले.
औेंढा नागनाथ येथील ग्रामीण रुग्णालयासमोर वाहन थांबवून त्यांनी नोटा मोजण्यास सुरवात केली. यावेळी महिला वाहनाबाहेरच थांबली होती. याचवेळी गस्तीवर असलेल्या औंढा पोलीस ठाण्याचे निरीक्षक विश्वानाथ झुंजारे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अफसर पठाण, जमादार संदीप टाक, रवी हरकाळ, अमोल चव्हाण यांनी महिलेस हटकले. पोलिसांना पाहताच महिलेसोबत असलेल्या वाहनातील पाच जणांच्या चेहऱ्यावर घाम फुटला. पोलिसांना संशय आल्याने पोलिसांनी महिलेकडे विचारणा केली. तिने आपली फसवणूक झाल्याचे सांगितले व तिला देण्यात आलेल्या ४० लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटांची बॅग दाखवली.
स्टेट बँकेचा मॅनेजर लघुशंकेच्या बहाण्याने उठला, पत्नीला शंका आली, बाजूच्या खोलीत पाहिलं अन् धक्काच बसला
पोलिसांनी सर्वांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणले. या प्रकरणाची माहिती पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, अप्पर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील यांना दिली. त्यानंतर मराठवाडा व विदर्भातील सर्व जिल्ह्यांची नाकेबंदी करण्याच्या सूचना देण्यात आल्या. या नाकेबंदीमध्ये पथकाने वाहनासह ज्ञानप्रकाश परमेश्वर जांगीड, लखन गोपाल बजाज,राहुल चंदुसिंग ठाकूर (सर्व रा. खामगाव) यांना ताब्यात घेतले.
पठ्ठ्यानं करुन दाखवलं! शेतकरी कुटुंबातील मुलगा झाला RTO इन्स्पेक्टर
दरम्यान, व्हिडीओ कॉलिंगवरून त्यांची ओळख पटल्यानंतर खामगाव पोलिसांनी त्यांच्या घराची झडती घेतली. त्यांच्या घरात ७५ लाख रुपये किंमतीच्या बनावट नोटा व बनावट सोने सापडले. त्यानंतर आज पहाटेच औढा पोलिसांच्या पथकाने खामगाव येथे जाऊन त्यांना ताब्यात घेतले. याप्रकरणात नऊ जणांची चौकशी सुरू असून औंढा नागनाथ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात येत आहे. उर्वरीत दोघांसह १० लाख रुपयांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.