Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Samsung Galaxy S22 Price cut
Samsung Galaxy S22 आता आधीच्या तुलनेत स्वस्त किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध करण्यात आले आहे. गेल्या महिन्यात Galaxy S22 च्या किंमतीत ही दुसरी कपात करण्यात आली आहे. याआधी नोव्हेंबर २०२२ मध्ये कंपनीने १२८ जीबी स्टोरेजच्या गॅलेक्सी एस २२ च्या किंमतीत १० हजार रुपयाची कपात करण्यात आली होती. हा फोन ६२ हजार ९९९ रुपये किंमतीत उपलब्ध करण्यात आला होता. आता पुन्हा एकदा या हँडसेटच्या किंमतीत ५ हजार रुपयाची कपात करण्यात आली आहे.
किंमतीत कपात करण्यात आल्यानंतर गॅलेक्सी एस २२ च्या १२८ जीबी स्टोरेज मॉडलला ५७ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते. तर २५६ जीबी स्टोरेज व्हेरियंटला ६१ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. या डिव्हाइसचे सर्व कलर ऑप्शनला स्वस्तात खरेदी करता येवू शकते. याशिवाय, Samsung Shop वरून फोनला खरेदी केल्यानंतर २ हजार रुपयाचा डिस्काउंट मिळेल. ग्राहकांना गॅलेक्सी एस २२च्या खरेदीवर OneDrive वरून100GB क्लाउड स्टोरेज फ्री मिळेल.
वाचाः ६ फेब्रुवारीला भारतात येतोय पोकोचा नवा स्मार्टफोन, पॉवरफुल फोनची किंमत किती?
नवीन गॅलेक्सी एस २३ स्मार्टफोनमध्ये फक्त चिपसेट आणि डिझाइनला अपग्रेड करण्यात आले आहे. गॅलेक्सी एस २२ या किंमतीत एक जबरदस्त ऑप्शन आहे. गॅलेक्सी एस २२ ला अँड्रॉयड १२ सोबत लाँच करण्यात आले होते. आता याला अँड्रॉयड १३ वर अपग्रेड करण्यात आले आहे. सॅमसंगने डिव्हाइस मध्ये ४ वर्षापर्यंत अँड्रॉयड आणि ५ वर्षापर्यंत सिक्योरिटी अपडेट मिळणार आहे. फोनमध्ये अँड्रॉयड १६ पर्यंत अपग्रेड मिळतील.
वाचाः कालच्या बजेटचा सोशल मीडियावर आज धुमाकूळ, पाहा मिम्स आणि ट्विटर हॉट ट्रेंड
Samsung Galaxy S22 specifications
Samsung Galaxy S22 स्मार्टफोनमध्ये ६.१ इंचाचा फुल एचडी प्लस डायनामिक AMOLED 2x डिस्प्ले दिली आहे. स्क्रीनचा रिफ्रेश रेट ४८ ते १२० हर्ट्ज आहे. स्क्रीन प्रोटेक्शनसाठी Gorilla Glass Victus+ पॅनेल दिले आहे. फोनमध्ये ८ जीबी रॅम 4nm ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 8 Gen 1 प्रोसेसर मिळते. सॅमसंगच्या या ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. जो ऑप्टिकल इमेज स्टेबिलायझेशन सोबत येतो. या फोनमध्ये वाय अँगल लेन्स सोबत ५० मेगापिक्सलचा प्रायमरी, १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड सेन्सर आणि १० मेगापिक्सलचा टेलिफोटो सेन्सर दिला आहे. गॅलेक्सी एस २२ मध्ये सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १० मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 3700mAh ची बॅटरी दिली आहे. जी 25W कन्वेंशनल आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट करते.
वाचाः Samsung Galaxy S23 सीरीज लाँच, दीड लाखाचा स्मार्टफोन iPhone 14 ला टक्कर देणार?