Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

तुला आदरांजली वाहावी लागेल असं वाटलं नव्हतं, काँग्रेस युवा नेत्याच्या निधनाने खचले किरण माने

7

मुंबई: नाशिक ग्रामीण भागातून बुधवारी रात्री एक धक्कादायक बातमी समोर आली. नाशिक ग्रामीण युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष मानस पगार यांचे भीषण अपघातात निधन झाले. युवक काँग्रेसमधील एक आक्रमक चेहरा हरपल्याने सर्वच स्तरातून हळहळ व्यक्ते केली जातेय. बिग बॉस मराठीचा चौथा सीझन गाजवणारे अभिनेते किरण माने यांनीही मानस यांच्यासाठी भावुक करणारी पोस्ट केली आहे. किरण आणि मानस यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण संबंध होते, हे या पोस्टवरुन दिसून येते.

हे वाचा-आयुष्यात कधीही लग्न करू नका… सिद्धार्थ जाधवने शेअर केलेला Video चर्चेत

काय म्हणाले किरण माने?

किरण माने यांनी फेसबुकवर मानस यांचा फोटो शेअर करत हळहळ व्यक्त केली. किरण यांनी लिहिले की, ‘तुका म्हणे मरण आहे या सकळां… भेणें अवकळा अभयें मोल! हे सगळं मान्य आहे. तरीही समविचारी मित्राचं असं अकाली, अनपेक्षित,अपघाती जाणं लै लै लै जिव्हारी लागतं. माझ्यापेक्षा लहान होतास मानस, अजून खूप काही करायचं होतं. खूप जगायचं होतं. माझ्या अनेक पोस्टस् वाचून तुझे येणारे कौतुकाचे, चिकित्सेचे, विश्लेषणाचे मोठ्ठाले फोन्स, लांबलचक मेसेजेस, भरपूर गप्पा.. आणि शेवटी, ‘नाशिकला आल्यावर घरी या सर’ हे सगळं सगळं सगळं खूप मिस करेन.’

माने यांनी पुढे लिहिले की, ‘एक दिवस तुला आदरांजली वाहण्याची पोस्ट करावी लागेल असं स्वप्नातही वाटलं नव्हतं. तुझ्यासारख्या विवेकी, संयमी, अभ्यासू मित्राची अशी एक्झिट सहन होत नाही गड्या. लै खचल्यासारखं वाटतंय’. किरण मानेंच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट करत मानस यांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांच्या अशा अचानक जाण्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये मानस यांच्यासोबतचे फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला.

हे वाचा-तो परत आलाय! ‘पठाण’नंतर शाहरुखचा ‘जवान’ करणार धमाका; खतरनाक लूक व्हायरल

भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्या घराबाहेर मानस यांनी केलेल्या आंदोलनाची विशेष चर्चा झालेली. शेतकऱ्यांसाठी दानवेंनी आक्षेपार्ह भाषा वापरल्याने त्यांच्या घरासमोर मानस आणि काही कार्यकत्यांनी हे आंदोलन केलेलं. या आंदोलनानंतर मानस आणि त्यांच्या सहकऱ्यांना अटकही झालेली. त्यांच्या सुटकेसाठी युवक काँग्रेसकडून सोशल मीडियावर मोहीम राबण्यात आली होती.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.