Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातर्फे घेण्यात आलेल्या व्यावसायिक पदवीसह पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या परीक्षेतील निकाल वेळेत जाहीर करण्यासाठी धांदल उडाली आहे. यंदा प्रथमच उत्तरपत्रिका मूल्यांकनसाठी डिजिटल व्हॅल्युएशन सिस्टीम राबविण्यात येत आहे. उत्तरपत्रिकांची स्कॅनिंग, तपासणी प्रक्रिया संत गतीने आहे. विविध अभ्यासक्रमांच्या २८ हजार ८८७ उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग झाले. सुमारे २७ हजार १२८ विद्यार्थ्यांपैकी ४५६ विद्यार्थ्यांची मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यामुळे निकाल लांबण्याची शक्यता आहे.
यंदा प्रथमच विद्यापीठाने मूल्यांकनासाठी डिजीटल व्हॅल्युएशन सिस्टीम अंमलात आनली आहे. ही प्रक्रिया १७ जानेवारीपासून सुरू करण्यात आली. अभ्यासक्रमाच्या संख्येनुसार विषयांच्या उत्तरपत्रिकांची संख्या मोठी आहे. सुरुवातीला स्कॅनिंग प्रक्रियेसाठीच प्रशासनाची धांदल उडाली असून तपासणीची प्रक्रियेवरही परिणाम झाल्याचे सांगण्यात येते. त्यामुळे निकाल लांबणीवर पडतील, अशी शक्यता सांगितली जात आहे. विद्यापीठाने प्रथमच प्रयोग केल्याने तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागतो आहे.
परीक्षा मूल्यांकनसाठी डिजिटल व्हॅल्युएशन सिस्टीम अंमलात आणण्यात आली आहे. एमए अर्थशास्त्र, इंग्रजी, हिंदी, एमएस्सीमध्ये वनस्पतीशास्त्र, केमिस्ट्री, संगणक विज्ञान, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान, गणित, प्राणीशास्त्र, योगासह बीकॉम अभ्यासक्रमांच्या २८ हजार ८८७ उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग करण्यात आले आहे. त्यासह २७ हजार १२८ विद्यार्थ्यांपैकी ४५६ विद्यार्थ्यांची मूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण झाली. मूल्यांकनाची प्रक्रिया २६ हजार ६७२ विद्यार्थ्यांसाठी अपूर्ण असल्याचे आकडेवारीवरून समोर आली आहे. प्रक्रिया वेगाने करण्यासाठी प्रशासनाची धावपळ सुरू आहे.
इतर तीन विभागही मदतीला
सेंटरमधील कामाचा आढवा कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी घेतला. १८ ते २५ जानेवारी या काळात झालेल्या डिजिटल मूल्यांकनाचा आढावा घेऊन त्यांनी ग्रंथालयासोबतच इतर विभागांनाही मदतीला घेण्याचे निर्देश दिले. ग्रंथालयासोबतच इतर तीन विभागांतही केंद्र सुरू करण्याच्या सूचना कुलगुरूंनी दिल्या. यामध्ये संगणकशास्त्र, व्यवस्थापनशास्त्र, केमिकल टेक्नॉलॉजीचा समावेश आहे. यांच्या संगणक प्रयोगशाळांमध्ये डिजिटल तपासणीची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येते.
उत्तरपत्रिकांचे स्कॅनिंग… २८,८८७
मूल्यांकन स्थिती अहवाल..
विद्यार्थी संख्या २७,१२८
एकूण मूल्यमापन झाले ४५६
एकूण प्रलंबित मूल्यमापन २६,६७२
पदवी अभ्यासक्रमांमध्ये महत्त्वाचे बीए, बीकॉम, बीएससी अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झाले. व्यावसायिक पदवीसह पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन डिजिटल पद्धतीने करीत आहोत. त्याची प्रक्रियाही सुरू आहे.
– डॉ. गणेश मंझा, संचालक, परीक्षा व मूल्यमापन मंडळ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद