Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शैक्षणिक वर्ष २०२२-२०२३ मधील ऑक्टोबर-नोव्हेंबर २०२२ हिवाळी सत्रातील पदवी व पदव्युत्तर अभ्यासकमाच्या परीक्षा विविध केंद्रावर सुरू आहेत. या परीक्षांना स्थगिती देण्यात आली आहे. अकृषी विद्यापीठीय व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत.
या मागण्याच्या अनुषंगाने महाराष्ट्र राज्य विद्यापीठीय व महाविद्यालयीन सेवक संयुक्त कृती समितीने २ फेब्रुवारीपासून परीक्षांच्या कामकाजावर बहिष्कार टाकून आंदोलन सुरू केले आहे.
या आंदोलनामुळे परीक्षाच्या कामकाजामध्ये अडचणी निर्माण झाल्याने मुंबई विद्यापीठाकडून हा निर्णय घेण्यात आला आहे. ३ फेब्रुवारीपासूनच्या विद्यापीठामार्फत घेण्यात येणाऱ्या परीक्षा स्थगित करण्यात येत असल्याचे नोटिफिकेशन जाहीर करण्यात आले आहे.
विद्यापीठाच्या विविध शैक्षणिक विभागाचे संचालक प्रमुख, विद्यापीठाशी संलग्नित संचालित महाविद्यालयांचे प्राचार्य, मान्यताप्राप्त संस्थाचे संचालक प्रमुख दूर व मुक्त अध्ययन संस्थेचे प्राध्यापक नि संचालक, विद्यापीठाच्या रत्नागिरी, ठाणे व कल्याण उपकेंद्रांचे समन्वयक/संचालक यांना यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे.
स्थगित करण्यात येत असलेल्या परीक्षांचे सुधारित वेळापत्रक विद्यापीठाच्या अधिकृत संकेत स्थळावरून प्रसिध्द करण्यात येणार आहे.