Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

नवाजुद्दीन मुलांचं संगोपन करत नसल्याचा बायकोचा गंभीर आरोप, १३ वर्षीय लेकीची आलियाला चिंता

23

मुंबई: बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याची बायको आलिया सिद्दीकी यांच्यातील वाद चव्हाट्यावर आले आहेत. आलियानं पुन्हा एकदा नवाजुद्दीनवर आरोप केले आहेत. आलियाच्या मते मुलांच्या संगोपनासाठी नवाजुद्दीनं एकही पैसा देत नाही. याबाबत आलियाचे वकील रिजवान यांनी ई टाइम्सला दिलेल्या मुलाखतीमध्ये या दोघांमधील वादाची माहिती दिली आहे.

काय म्हणाले वकील

आलिया सिद्दीकीचे वकील रिझवान सिद्दीकी यांनी मुलाखतीमध्ये सांगितलं की, ‘आलिया सिद्दिकी २२ जानेवारी रोजी नवाजला त्याच्या वर्सोवा इथल्या घरी भेटण्यासाठी गेली होती. तिला काही कौटुंबिक गोष्टींबाबत त्याच्याशी चर्चा करायची होती. त्या दोघांमध्ये प्रॉपर्टीबद्दल काहीही वाद नाहीत. त्या दोघांमध्ये त्यांची मुलगी जोहरा हिच्यासंदर्भात काही वाद आहेत. हा मुलीबाबतचा वाद असल्यानं त्याबद्दल मी अधिक काही सांगणार नाही.’ रिजवान यांनी पुढं सांगितलं की, ‘आलिया जेव्हा नवाजच्या घरी गेली तेव्हा तो घरी नव्हता. त्याला आलियाला भेटायचंही नव्हतं. इतकंच नाही तर त्यानं आलियाचे फोन घेणं ही बंद केलं. आलिया नवाजच्याच घरी असून तो चित्रीकरणावरून परतण्याची ती वाट बघत आहे. तो आल्यानंतर आलिया त्याच्याशी बोलणार आहे.’

दुबईहून मुंबईला आली आलिया

गेल्या दोन वर्षांपासून आलिया तिच्या मुलांबरोबर दुबईमध्ये रहात आहे. आलियानं दुबईला मुलांच्या शिक्षणासाठी रहावं हा निर्णय नवाजनं घेतला होता. त्यामुळे आलिया तिथं रहात होती. परंतु मुलीसाठी आलिया मुंबईत परत आली. त्यावेळी नवाजच्या आईनं आलियाविरोधात घरात बळजबरी घुसल्याविरोधात (ट्रेसपास) तक्रार दाखल केल्याचं रिझवान सिद्दीकी यांनी सांगितलं. हे सगळं आलिया आल्यानंतर काही तासांमध्ये घडलं. रिझवान यांनी पुढं सांगितलं की, ‘कायद्यानुसार नवरा त्याच्या बायकोवर ट्रेसपासची केस दाखल करू शकत नाही. जर ४१ अ अंतर्गंत नोटीस काढली तर कायदेशीर नियमांनुसारच त्याची कारवाई केली जाते. परंतु ही कारवाई न करता पोलिसांनी काही तासांमध्ये आलियाविरोधात हा गुन्हा दाखल केला आणि तिला अटक करण्याची नोटीसही पाठवली.’

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या आईचे आलियावर आरोप

रिझवान यांनी पुढे सांगितले की, ‘रात्री दोन वाजण्याच्या सुमारास पोलिस असताना नवाजुद्दीनची आई आलियाला सतत तू नवाजदुद्दीनची बायको नाही, तुझा या घरावर काही हक्क नाही. तुमचा तर घटस्फोट झाला आहे. तुझा दुसरा मुलगा अनौरस आहे अशा प्रकारचे आरोप करत होती. त्यांनी केलेल्या या आरोपांमुळे त्यांच्याविरोधात कलम ५०९ अंतर्गंत मॉडेस्टीचा गुन्हा दाखल होऊ शकते. हे सगळं पोलिसांच्या समोर होत होतं. परंतु पोलिसांनी आलियाच्या सासूची बाजू ऐकून घेत त्यांची केस नोंदवून घेतली. तिथून आलियानं मला फोन केला. त्यानंतर मी लगेचच ५०९ आणि डोमेस्टिक व्हॉयलनस् अंतर्गंत अंधेरी न्यायालयात केस दाखल केली आहे. ७ तारखेला अंधेरी न्यायालयात त्याची सुनावणी होणार आहे. त्याशिवाय कलम ४९० अंतर्गंत देखील गुन्हा दाखल आहे. कोर्टानं नोटीस जारी केली आहे. त्यावर आलियाची सही घेण्यासाठी आम्ही गेलो तेव्हा नवाजच्या घराबाहेर असलेल्या सुरक्षारक्षकांनी आम्हाला आतामध्ये जाण्यापासून रोखले होते.’


नवाज करत नाही मुलांचा खर्च

रिझवान यांनी मुलाखतीमध्ये पुढं सांगितलं की, ‘आलिया आधी एकटी मुंबईत आली. त्यानंतर तिनं मेडच्या मदतीनं मुलांना दुबईतून भारतात बोलावून घेतलं. नवाजच्या सांगण्यावरूनच आलिया मुलांना घेऊन दुबईला गेली होती. सुरुवातीला नवाज मुलांच्या संगोपनासाठी पैसे पाठवत होता. परंतु नंतर त्यानं पैसे पाठवणं बंद केलं. त्यामुळे कोणत्याही आर्थिक पाठबळाशिवाय आलिया कसंबसं जगत नवाजची वाट बघत होती. आता नवाज आलिया त्याची बायको नसल्याचं सांगत आहे. जर त्याची ती बायको नाही तर मग नवाजवर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकतो.’

मुलीबाबत नवाज बेफिकीर

मुलाखतीमध्ये रिजवान यांनी पुढं सांगितलं की, ‘नवाज आणि आलियामध्ये कोणत्याही प्रकारचा आर्थिक वाद नाही. जो काही वाद आहे तो त्यांची मुलगी जोहरा हिच्या संदर्भात आहे. जोहरा १३ वर्षांची आहे. परंतु तिच्या संगोपनाकडे नवाजचं अजिबात लक्ष नाही. तो कोणत्याही अनोळखी लोकांबरोबर तिला बाहेर पाठवतो हे अतिशय चुकीचं आहे. याचसंदर्भात आम्ही त्याला नोटीस पाठवली आहे. हे प्रकरण खूपच संवेदनशील आहे. त्यामुळेच आलिया त्याच्याशी प्रत्यक्ष बोलायला गेली होती. नवाजच्या या दुर्लक्षामुळे मुलीचं आयुष्य संकटात जाण्याची आलियाला भिती आहे.’



Source link

Leave A Reply

Your email address will not be published.