Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सेल्फी मौसी’, ‘उस्ताद घरचोरदास’, ‘फनवीर सिंग’ (रणवीर सिंगची नक्कल करणारा) आणि सागर पगलेतू यांसारख्या वेगवेगळ्या पात्रांनी द कपिल शर्मा शोमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेणारा सिद्धार्थ सागर द कपिल शर्मा शो सोडत आहे. त्याच्या या निर्णयामागे शोच्या निर्मात्यांसोबतची पैशाची समस्या असल्याचे म्हटले जात आहे. सिद्धार्थला त्याची फी वाढवून हवी होती मात्र पण निर्माते तसे करायला तयार नव्हते आणि म्हणून त्याने शो सोडण्याचा निर्णय घेतला आहे. ‘द कपिल शर्मा शो’च्या शूटिंगसाठी मुंबईत शिफ्ट झालेला सिद्धार्थ दिल्लीतील आपल्या घरी परतला आहे. शोमध्ये त्याच्या परतण्याची शक्यता कमी आहे.
सिद्धार्थच्या आधी या कलाकारांनी शो सोडला
अलीकडच्या काळात ‘द कपिल शर्मा शो’ सोडणारा सिद्धार्थ सागर हा एकमेव कलाकार नाही. सिद्धार्थच्या आधी कृष्णा अभिषेक, भारती सिंग, चंदन प्रभाकर, सुनील ग्रोवर, अली असगर, उपासना सिंह यांनीही शो सोडला होता. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये सिद्धार्थ या शोमध्ये सहभागी झाला होता. कृष्णा अभिषेक शोमधून बाहेर पडल्यानंतर त्याला शोमध्ये घेण्यात आले होते. सिद्धार्थ सागरला याबाबत प्रश्न विचारला असता, सुरुवातीला त्याने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. मात्र, नंतर तो म्हणाला, ‘असे काही नाही, मी आता याबद्दल बोलू शकत नाही कारण, आमची बोलणी सुरू आहेत.’
कृष्णा आणि कपिल पुन्हा एकत्र दिसणार
यापूर्वी एका पत्रकार परिषदेत कृष्णा अभिषेकने खुलासा केला होता की कपिल आणि तो लवकरच एकत्र येण्याचा विचार करत आहेत. या शोमुळे त्यांच्यात कोणताही मतभेद झालेला नाही. सध्याच्या सीझनमध्ये नाही पण पुढच्या सीझनपर्यंत कृष्णा ‘द कपिल शर्मा शो’ मध्ये पुन्हा एंट्री करण्याचा विचार करत आहे.
श्रेयाचा एक फोन आणि तिचं संपूर्ण आयुष्यच बदललं, काय झालं नेमकं?
हा शो ७ वर्षांपूर्वी सुरु झाला होता
‘द कपिल शर्मा शो’ हा २०१६ मध्ये सुरु झाला. तेव्हापासून हा भारतीय टेलिव्हिजन शोमधील सर्वात लोकप्रिय कॉमेडी शो आहे. सध्या या शोमध्ये कपिल शर्मा, सुमोना चक्रवर्ती, किकू शारदा, राजीव ठाकूर इत्यादी कलाकार प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहेत.