Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दुसऱ्या पसंतीक्रमाची आयडिया अंगलट? रणजीत पाटलांच्या हक्काची मतं बाद झाल्यानं खेळ उलटणार?

21

अमरावती : अमरावती पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत मतमोजणी सुरू आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडी चे उमेदवार धीरज लिंगाडे आणि भाजपचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांच्यात काट्याची लढत झाली. एकूण १ लाख २४०३ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. यामध्ये ८ हजार ५५१ मध्ये अवैध ठरली. त्यात अवैध मतदानात पाटलांना जबरदस्त फटका बसल्याचे निवडणुकीच्या मतमोजणीतील स्थितीवरुन दिसून येत आहे. एकूण मतदानाच्या पैकी ८५५१ मते अवैध ठरली यामधील सुमारे ६ हजार मतांच्या मतपत्रिकेत मतदारांनी रणजीत पाटील यांच्यासमोर फक्त दोन आकडा लिहिल्याचं निरीक्षण निवडणूक तज्ञ निरीक्षकांनी नोंदवले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार डॉ. रणजीत पाटील हे बॅलेट पेपरवर दुसऱ्या क्रमांकावर होते. बहुतांश मतदारांनी फक्त त्यांच्या नावापुढे २ हा आकडा लिहिला. पहिल्या व इतर कुठल्याही क्रमांकाची पसंती मतदारांनी त्या बॅलेट पेपरवर नोंदवली नाही. बहुतांश बॅलेट पेपरवर भाजपचे उमेदवार डॉ.पाटील यांच्या समोरच २ चा आकडा लिहिला होता. त्यामुळे सुमारे सहा हजारांपेक्षा अधिक मते सरळ निवडणुकीतून अवैध ठरली असून भाजप उमेदवाराला बसण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जात आहे.

कॉलेजच्या बाहेरच दोघांनी विद्यार्थ्याला गाठलं, चाकू काढला अन्… चेंबूर हादरलं…

अमरावती पदवीधर मतदार निवडणुकीमध्ये एकूण २०६१७२ उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १०२४०३ नागरिकांनी मतदानाचा हक्क बजावला. यापैकी ९३ हजार ८५२ मते वैध ठरली तर ८५५१अवैध ठरली यापैकी बहुतांक्षमतेही फक्त बॅलेट पेपरवर दोनचा आकडा लिहिल्याने अवैध ठरल्याचे निरीक्षण राजकीय धुरंधरांनी नोंदविले. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार धिरज लिंगाडे यांना ४३३४७ मते मिळाली तर भाजपच्या रणजीत पाटील यांना ४१०२७ मतं मिळाली आहेत.

दुधाची पिशवी उधार दिली नाही म्हणून दोघांवर जीवघेणा हल्ला, बुलडाण्यातील धक्कादायक घटना.

या निवडणुकीमध्ये भाजप समर्थक मतदारांनी कुठलाही विचार न करता उमेदवार डॉ. रणजीत पाटील यांच्या नावापुढे फक्त २ चा आकडा लिहिला. पहिला पसंती क्रमांक बॅलेट पेपरवर नसल्याने भाजप उमेदवाराच्या नावापुढे २ चा आकडा लिहिल्याने सुमारे ६ हजार मतं अवैध ठरली असून याचा फटका उमेदवाराला बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

VIDEO: कार्यकर्त्याने फुल्ल जोशात विजयी घोषणा दिली, सत्यजीत तांबे म्हणाले, ‘थांब भाऊ सर्टिफिकेट भेटायचंय’

माझा कार्यकर्त्यांवर विश्वास, विजय आमचाच; निवांत,शांत मूडमध्ये रणजीत पाटलांचे मतदान

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.