Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

एकच वादा, सत्यजीत दादा… घोषणा देणाऱ्या कार्यकर्त्याला सत्यजीत तांबेंनी थांबवलं, कारण…

16

नाशिक: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिलेल्या नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत अखेर सत्यजीत तांबे यांनी विजयी निशाण फडकावले आहे. सत्यजीत तांबे यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांना २९४६५ इतक्या मताधिक्याने पराभूत केले. सत्यजीत तांबे यांनी ६८९९९ मतं मिळाली, तर शुभांगी पाटील यांना ३९५३४ मिळाली. सत्यजीत तांबे यांनी दावा केल्याप्रमाणे भरभक्कम मताधिक्याने नाशिक पदवीधर मतदारसंघात विजय मिळवत तांबे घराण्याची परंपरा कायम राखली. साहजिकच त्यांच्या या विजयानंतर सत्यजीत तांबे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण होते. कार्यकर्त्यांनी गुलाल उधळून आनंद साजरा केला. सत्यजीत तांबे यांचे कुटुंबीयही या आनंदात सामील झाले होते. यावेळी घडलेल्या एका प्रसंगाने उपस्थितांमध्ये चांगलाच हशा पिकला.

नाशिकमधील मतमोजणी केंद्रावरून आलेल्या आकडेवारीनुसार सत्यजीत तांबे यांचा विजय अगदी स्पष्ट झाला. परंतु, निवडणूक आयोगाने सत्यजीत तांबे यांच्या विजयाची अधिकृत घोषणा केली नव्हती. मात्र, मतमोजणी केंद्रांवर प्रत्येक फेरीगणिक सत्यजीत तांबे यांची आघाडी वाढत गेली आणि कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. संपूर्ण चित्र स्पष्ट झाल्यानंतर सत्यजीत तांबे यांच्या कार्यकर्त्यांनी आणखी जोशात येऊन घोषणा द्यायला सुरुवात केली.

यावेळी सत्यजीत तांबे हे त्यांचे कुटुंबीय आणि काही कार्यकर्त्यांसोबत फोटोसेशन करत होते. तेव्हा फोटो काढत असताना कार्यकर्त्यांच्या गराड्यातील एकाने बेंबीच्या देठापासून, ‘एकच वादा, सत्यजीत दादा’, अशी घोषणा दिला. यावर सत्यजीत तांबे यांनी मिश्किलपणे टिप्पणी केली. त्या कार्यकर्त्याकडे पाहत सत्यजीत तांबे म्हणाले की, ‘थांब भाऊ सर्टिफिकेट भेटायचंय’. सत्यजीत तांबे यांच्या या मजेशीर वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. या निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उतरून सत्यजीत तांबे यांनी खूप मोठा राजकीय धोका पत्कारला होता. काँग्रेस पक्षाने त्यांना निवडणुकीत पाठिंबा दिला नव्हताच पण सत्यजीत यांना पक्षातून सहा वर्षांसाठी निलंबितही करण्यात आले होते. अशावेळी काँग्रेसचा पारंपारिक पदवीधर मतदार सत्यजीत तांबे यांच्या पाठिशी उभा राहील का, याबाबत शंका होती. तसेच महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपली एकत्रित ताकद शुभांगी पाटील यांच्यापाठी उभी केल्याने काहीसे चिंतेचे वातावरण होते. परंतु, सत्यजीत तांबे यांनी मोठ्या मताधिक्याने विजय मिळवत नाशिक पदवीधर मतदारसंघातील तांबे घराण्याचे वर्चस्व शाबूत असल्याचे दाखवून दिले.
विधानसभेला काँग्रेसकडून लढले पराभव झाला, पोरासाठी वडिलांनी जागा सोडली, अपक्ष लढून सत्यजीत तांबेंनी मैदान मारलं
दरम्यान, काहीवेळानंतर सत्यजीत तांबे यांना अधिकृतरित्या विजयी घोषित करण्यात आले. मतमोजणी पूर्ण होऊन अहवाल भारत निवडणूक आयोगाकडे पाठविण्यात आला. आयोगाच्या परवानगीने श्री गमे यांनी सत्यजित तांबे यांना विजयी उमेदवार म्हणून घोषित केले व त्यांना विजयी उमेदवाराचे प्रमाणपत्र प्रदान केले.
Satyajeet Tambe: माझा मित्र गेलाय, आज कोणताही आनंदोत्सव नाही; सत्यजीत तांबे मानसच्या एक्झिटने व्यथित

सगळ्याच फेऱ्यांमध्ये सत्यजीत तांबे आघाडीवर

या निवडणुकीत शुभांगी पाटील मविआच्या एकत्रित ताकदीमुळे सत्यजीत तांबे यांच्यासमोर आव्हान उभे करतील, असे वाटले होते. परंतु, पहिल्या फेरीपासूनच सत्यजीत तांबे यांनी आघाडी घेत निर्विवाद वर्चस्व राखले. सत्यजित तांबे यांना पहिल्या फेरीत १५७८४ तर शुभांगी पाटील यांना ७८६२ मते होती त्यानंतर त्या फेरीत तांबे यांना ३१००९ आणि पाटील यांना १६३१६ इतकी मते होती तिसऱ्या फेरी अखेर देखील सत्यजित तांबे हेच आघाडीवर होते ४५६६० तर शुभांगी पाटील यांना २४९२७ एवढे मत होती चौथ्या फेरीत सत्यजित तांबे यांना ६०१६१ मते मिळाली तर शुभांगी पाटील यांना 33776 मते मिळाली चौथ्या फेरी अखेर सत्यजित तांबे २६३८५ मतांनी आघाडीवर होते. अखेरच्या पाचव्या फेरीत आपक्ष उमेदवार सत्यजित तांबे यांना ६८९९९ मतं तर विकास आघाडीच्या शुभांगी पाटील यांना ३९५३४ मत मिळाली आहेत. सत्यजित तांबे तब्बल २९ हजार ४६५ इतक्या मताधिक्याने विजयी झाले आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.