Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१० फेब्रुवारीला येतोय कोका कोलाचा फोन, १०८ मेगापिक्सलचा कॅमेरा, किंमत खूपच कमी

8

नवी दिल्लीः Realme 10 Pro 5G Coca-Cola Edition भारतात लाँचिंगसाठी तयार आहे. या स्पेशल एडिशन फोनला इंडियात पुढील आठवड्यात म्हणजेच १० फेब्रुवारी रोजी दुपारी १२.३० वाजता लाँच करण्यात येणार आहे. Realme 10 Pro 5G आधीपासून मार्केटमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे असे मानले जात आहे की, Coca-Cola Edition मध्ये मिळणारे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स रियलमी १० प्रो ५जी प्रमाणे असतील. जाणून घ्या डिटेल्स.

Realme 10 Pro 5G Coca-Cola Edition लाँच डेट
कंपनीने अधिकृतपणे Realme 10 Pro 5G Coca-Cola Edition च्या लाँचिंग तारीखवरून पडदा हटवला आहे. खरं म्हणजे रियलमी इंडियाच्या वेबसाइटवर रियलमी १० प्रो कोका कोला एडिशनच्या लाँचिंगची तारीख याच्या लँडिंग पेजवर दिसत आहे. या फोन संबंधी अद्याप कोणतीही माहिती दिली नाही. परंतु, एका ट्विटर यूजने या फोनच्या रियर पॅनेलची झलक दाखवली आहे. त्यामुळे तुम्ही असे पाहू शकता की, हा फोन एक ड्युअल टोन डिझाइन सोबत येईल. कॅमेरा मॉड्युल आणि उजव्या बाजुला रियलमी सोबत एक ब्लॅक पार्ट असेल. कोका कोला ब्रँडिंग लाल कलर सोबत उजव्या बाजुला आहे. त्यामुळे अशी शक्यता वर्तवली जात आहे की, हा फोन त्याच फीचर्स सोबत येवू शकतो जे फीचर्स रियलमी १० प्रो ५जी मध्ये दिले आहेत.

वाचाः Samsung Galaxy S23 सीरीज लाँच, दीड लाखाचा स्मार्टफोन iPhone 14 ला टक्कर देणार?

Realme 10 Pro 5G specifications
Realme 10 Pro 5G मध्ये 120Hz रिफ्रेश रेट सोबत 6.72-इंच IPS LCD डिसप्ले दिला आहे. फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ६९५ च्या पॉवर सोबत येईल. तसेच या फोनमध्ये 6GB / 8GB LPDDR4x रॅम आणि 128GB UFS 2.2 स्टोरेज सोबत येईल. हा फोन Android 13 OS आणि Realme UI 4.0 वर रन करतो. सुरक्षा साठी या फोनमध्ये साइड फेसिंग फिंगरप्रिंट स्कॅनर दिले आहे. सेल्फीसाठी रियलमी १० प्रो मध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. याच्या बॅक पॅनेलवर १०८ मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा आणि २ मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर दिला आहे.

वाचाः ९ फेब्रुवारीला लाँच होतोय Realme GT Neo 5, पाहा संभावित फीचर्स

वाचाः ६ फेब्रुवारीला भारतात येतोय पोकोचा नवा स्मार्टफोन, पॉवरफुल फोनची किंमत किती?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.