Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वाचा: Realme च्या ‘या’ पॉप्युलर स्मार्टफोनवर हजारोंचा डिस्काउंट, फोनमध्ये १०८ MP कॅमेरा
OnePlus 10R 5G मध्ये काय खास?
या फोनमध्ये १०८० x २४१२ पिक्सेल रिझोल्यूशनसह ६.७-इंच फुल एचडी + 10-बिट AMOLED डिस्प्ले आहे. हा डिस्प्ले १२०Hz च्या रीफ्रेश रेट आणि ३६० Hz च्या टच सॅम्पलिंग दरासह येतो. HDR10+ फोनची चित्र गुणवत्ता आणखी चांगली बनवते. डिस्प्ले संरक्षणासाठी फोनमध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 वापरण्यात आला आहे.
वाचा: यूएसमधील शाळांपासून ते भारतातील महाविद्यालयांमध्ये का होतेय ChatGPT बॅन? पाहा डिटेल्स
हा 5G फोन 12 GB पर्यंत रॅम आणि 256 GB पर्यंत इंटर्नल स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध आहे. कंपनी त्यात MediaTek Dimensity 8100 Max चिपसेट देत आहे. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागील बाजूस एलईडी फ्लॅशसह ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. यामध्ये ५० मेगापिक्सेलच्या प्रायमरी लेन्सशिवाय ८ मेगापिक्सेल अल्ट्रा-वाइड अँगल आणि २-मेगापिक्सेल मॅक्रो लेन्सचा समावेश आहे.
सेल्फीसाठी, तुम्हाला फोनमध्ये १६ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. अंडर-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरने सुसज्ज असलेल्या या फोनमध्ये ५००० mAh बॅटरी आहे. ही बॅटरी ८० W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. हा फोन ४५०० mAh बॅटरी पर्यायात देखील येतो. फोनच्या या वेरिएंटमध्ये तुम्हाला १५० W चार्जिंग मिळेल.
वाचा: Budget 2023: KYC अधिक सोपे होणार, मिळणार वन-स्टॉप सोल्यूशन, एकाच अॅपवर होणार काम