Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

WhatsApp कॉल्सची मजा होईल दुप्पट, नवीन शॉर्टकट आहे जबरदस्त

9

नवी दिल्ली:WhatsApp Features: लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग प्लॅटफॉर्म WhatsApp वर, युजर्सना चॅटिंग आणि कॉलिंगसाठी अनेक फीचर्स मिळतात आणि त्यांच्या मदतीने एकमेकांशी कनेक्ट करणे खूप सोपे झाले आहे. आता प्लॅटफॉर्म अशा फीचरवर काम करत आहे, ज्याद्वारे कोणीही एका टॅपमध्ये मित्र किंवा नातेवाईकांना कॉल करू शकेल . व्हॉट्सअॅप युजर्सना प्लॅटफॉर्मवर व्हॉईस आणि व्हिडिओ कॉलिंगचा पर्याय बर्याच काळापासून मिळत आहे आणि या फीचरमध्ये सतत नवीन सुधारणा देखील केल्या जात आहेत.

वाचा: OnePlus चा स्मार्टफोन खरेदी करायचा करायचाय? पाहा ही डील, मिळतोय मोठा ऑफ

ग्रुप व्हिडिओ कॉलमधील सदस्यांची मर्यादा अलीकडेच वाढवण्यात आली आहे आणि युजर्सना व्हिडिओ आणि ऑडिओ कॉल्समध्ये सहजपणे स्विच करण्याचा पर्याय देखील मिळतो. आता शॉर्टकटच्या मदतीने कॉलिंगचा पर्याय उपलब्ध होणार आहे.

वाचा: जिओचे स्वस्तात मस्त प्लान्स, १५० GB पर्यंत डेटा, Netflix आणि Prime Video देखील मोफत

व्हॉट्सअॅप न उघडता कॉल करता येईल:

नवीन अहवालात असे सूचित करण्यात आले आहे की, शॉर्टकट फीचरच्या मदतीने युजर्स मेसेजिंग अॅप न उघडता संपर्क सूचीमध्ये सहज प्रवेश करू शकतील आणि त्यांना कॉल करू शकतील. याशिवाय, जे कॉन्टॅक्ट जास्त बोलतात त्यांच्यासाठी कस्टम शॉर्टकट तयार केले जाऊ शकतात. या शॉर्टकटवर एका टॅपने कॉल केला जाईल.

प्रक्रिया सामान्य फोन कॉल करण्यासारखी असेल:

WABetaInfo ने वृत्त दिले आहे की, ज्या नवीन फीचरर्सचे संकेत मिळताहेत, त्यामुळे WhatsApp संपर्कांना कॉल करणे मेसेज पाठवणे तितकेच सोपे होईल. एवढेच नाही तर, यूजर्स त्यांच्या डिव्हाईसच्या होमस्क्रीनवर कॉन्टॅक्ट अॅड करू शकतील असे या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे. सामान्य कॉल्सप्रमाणे, व्हॉट्सअॅप कॉन्टॅक्ट लिस्टमध्ये एकाच वेळी प्रवेश केला जाऊ शकतो आणि नावावर टॅप केल्याने कॉलचा पर्याय मिळेल.

भारतात ३६ लाख व्हॉट्सअॅप अकाउंट्सवर बंदी:

मेटाच्या मालकी अॅपने १ महिन्याच्या आत ३६ लाख भारतीय खात्यांवर बंदी घातली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. व्हॉट्सअॅपने शेअर केलेल्या मासिक अनुपालन अहवालात ही आकडेवारी समोर आली आहे.

वाचा: OnePlus चा स्मार्टफोन खरेदी करायचा करायचाय? पाहा ही डील, मिळतोय मोठा ऑफ

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.