Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Apple चे सीईओ टिट कुक मुंबईकरांना देणार खास भेट, केली मोठी घोषणा

4

नवी दिल्लीः Apple ने भारतात एक खास आगळा वेगळा रेकॉर्ड बनवला आहे. Apple चे सीईओ टिम कुकने म्हटले की, कंपनीने ब्राझील आणि भारतात तिमाहीत रेकॉर्ड सोबत भारतीय बाजारासाठी आणखी एक रिवेन्यू रेकॉर्ड बनवला आहे. आपल्या तिमाहीतील आकडेवारीला पोस्ट केल्यानंतर कुक यांनी गुरुवारी म्हटले की, भारतात व्यापार करताना आम्ही एक तिमाही रिवेन्यू रेकॉर्ड बनवला आहे. वर्षापाठोपाठ आकड्यात वाढ होत आहे. त्यामुळे आम्हाला आनंद होत आहे.

भारतीय बाजार खूपच महत्त्वपूर्ण
टिम कुक यांनी घोषणा केली की, गंभीर परिस्थितीत सुद्धा भारतीय बाजाराने कमाल केली आहे. भारत आमच्यासाठी खूपच महत्त्वपूर्ण बाजार आहे. तसेच एक प्रमुख फोकस आहे. आम्ही २०२२ मध्ये ऑनलाइन स्टोरवर आलो आहोत. आम्ही लवकरच या ठिकाणी Apple रिटेल आणणार आहोत. Apple लवकरच मुंबईत आपले पहिले ‘ब्रिक-एंड-मोर्टार स्टोर’ (Brick-And-Mortar Stores) लाँच करणार आहे.

वाचाः Samsung Galaxy S23 सीरीज लाँच, दीड लाखाचा स्मार्टफोन iPhone 14 ला टक्कर देणार?

भारतात दिसणार Apple चे ऑनलाइन स्टोर्स
टिम कुकने पुढे म्हटले की, कोविड असूनही आम्ही भारतात शानदार काम केले आहे. माझ्या अपेक्षा आता आणखी वाढल्या आहेत. याच कारणामुळे आम्ही या ठिकाणी विक्री, ऑनलाइन स्टोअर आणणार आहोत. त्यासाठी गुंतवणूक करीत आहोत. मी भारतासंबंधी खूप उत्सूक आहे.

वाचाः ६ फेब्रुवारीला भारतात येतोय पोकोचा नवा स्मार्टफोन, पॉवरफुल फोनची किंमत किती?

Apple CEO Tim Cook ने सांगितले की, आम्ही बाजारावर जास्त फोकस करीत आहोत. प्रोडक्टला खूप स्वस्त बनवण्यासाठी प्रयत्न करीत आहोत. तसेच जास्त ऑफर्स देण्याचा प्रयत्न करीत आहोत. कंपनीचे चीफ फायनान्शियल अधिकारी लुका मास्त्री यांनी सांगितले की, ब्राझील, मॅक्सिको, भारत, इंडोनेशिया, थायलँड आणि व्हिएतनाम सारख्या बाजारात मजबुत वाढ दिसत आहे. प्रमुख प्रोडक्ट कॅटेगरी आणि ग्राफिक सेगमेंटचे शानदार निकाल समोर येत आहेत. Apple ने २०२२ च्या चौथ्या तिमाहीत भारतात २ मिलियन (२० लाख) आयफोनची विक्री केली आहे.

वाचाः एक छोटं भाषण अन् थेट मुख्यमंत्र्यांची भेट, सोशल मीडियाची ‘पॉवर’ पुन्हा दिसली

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.