Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
राज्यसेवा परीक्षेतील बदल २०२३पासूनच करण्याचा निर्णय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घेतला होता. या निर्णयाला आंदोलक स्पर्धा परीक्षार्थींनी समर्थन देत घोषणाबाजीही केली.
घटनात्मक संस्था असलेल्या एमपीएससीने घेतलेल्या निर्णयाच्या समर्थनार्थ स्पर्धा परीक्षार्थी रस्त्यावर उतरले आहेत. ‘स्वायत्त आयोग आमचा आधार’ असे फलक घेऊन परीक्षार्थी आंदोलनाला रस्त्यावर बसले आहेत. एमपीएससीच्या निर्णयाच्या विरोधात आणि समर्थनार्थ असे स्पर्धा परीक्षार्थींचे दोन गट पडल्याचे दिसून येत आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षेत बदल करण्याचे जाहीर केले आहे. तसेच हे बदल २०२३ पासून लागू होणार असल्याचेही स्पष्ट केले आहे. मात्र २०२३ ऐवजी २०२५पासून हे बदल लागू करण्याची मागणी अनेक उमेदवारांनी केली आहे.
या अनुषंगाने काही दिवसांपूर्वी काँग्रेसतर्फे दोनवेळा आंदोलन करण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर स्पर्धा परीक्षार्थींनी मंगळवारी पुण्यात आंदोलन केले. आमदार गोपीचंद पडळकर, अभिमन्यू पवार, सदाभाऊ खोत यांनी या आंदोलनात सहभाग घेतला. तसेच आंदोलनस्थळावरूनच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधला असता फडणवीस यांनी राज्यसेवेतील बदल २०२५पासून लागू करण्याच्या अनुषंगाने सकारात्मक भूमिका घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एमपीएससीला पत्र लिहून २०२५पासून बदल लागू करण्याची विनंती केली.