Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

दिवसभराच्या मतमोजणीनंतर हार्ट अटॅक, अमरावती पदवीधर निवडणुकीवेळी अधिकाऱ्याचा मृत्यू

6

अमरावती : अमरावती पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीवेळी मंडळ अधिकाऱ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. शाहूराव खडसे यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची माहिती आहे. गुरुवारी दिवसभर मतमोजणी केल्यानंतर खडसेंना छातीदुखीचा त्रास होत होता. त्यानंतर रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांनी प्राण गमावले.

अमरावती पदवीधर निवडणुकीच्या मतमोजणीवेळी आक्रित घडलं. नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील शिवणी येथील मंडळ अधिकाऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. शाहूराव खडसे असे त्यांचे नाव आहे.

काल (गुरुवार २ फेब्रुवारी) दिवसभर निमानी गोडाऊन याठिकाणी अमरावती पदवीधर निवडणुकीची मतमोजणी सुरू झाली होती. रात्री मंडळ अधिकारी शाहूराव खडसे यांना छातीत दुखत होते.

शाहूराव यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र रात्री उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मात्र ते घरी गेले तेव्हा त्यांची तब्येत बिघडली, असं वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितलं.

दरम्यान, अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणुकीच्या मतमोजणीत सर्वाधिक 46 हजार 344 मते मिळून महाविकास आघाडीचे उमेदवार धीरज रामभाऊ लिंगाडे हे विजयी उमेदवार ठरले.

निवडणूकीत झालेल्या 1 लाख 2 हजार 587 मतदानापैकी 93 हजार 852 एवढी मते वैध व 8 हजार 735 मते अवैध ठरली. अवैध ठरलेल्या 8 हजार 735 मतांचे फेरअवलोकन करण्याची मागणी उमेदवार डॉ. पाटील यांच्या प्रतिनिधींनी केली. त्यानुसार या मतांची फेरमोजणी करण्यात आली. यापैकी 348 मते वैध मानण्यात आली. त्यानुसार एकूण वैध मते 94 हजार 200 ही संख्या निश्चित होऊन 8 हजार 387 मते अवैध ठरली. विजयासाठी 47 हजार 101 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला.

दोन उमेदवारामध्ये प्रथम क्रमांकाची सर्वाधिक 46 हजार 344 मते श्री. लिंगाडे यांना व दुस-या क्रमांकाची 42 हजार 962 मते डॉ. पाटील यांना मिळाली. त्यानुसार श्री. लिंगाडे यांना 3 हजार 382 ही अधिकची मते मिळाल्याने त्यांना विजयी घोषित करण्यात आले.

हेही वाचा : मॉलमध्ये खरेदी करुन परतताना घात, एक चूक आणि बाईकस्वार जीवलग मित्रांचा जीव गेला

अमरावती पदवीधर मतदार संघ निवडणूक मतमोजणीला बडनेरा रस्त्यावरील नेमाणी गोडाऊन येथे काल दि. 2 फेब्रुवारी रोजी सकाळी 8 वाजतापासून सुरू झाली. तब्बल 34 तास ही प्रक्रिया चालली. निवडणुकीत 265 टपाली मतपत्रिकांपैकी प्रतिज्ञापत्र नसणे, सही, साक्षांकन, सीलबंद पाकिटात नसणे आदींमुळे 73 मतपत्रिका रद्द करण्यात आल्या.

हेही वाचा : …तर हे माझा जीव घेतील, सुशांतचा आईला फोन ठरला अखेरचा, मृत्यूचं गूढ उलगडण्याच्या मार्गावर

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.