Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पीकेचा रेकॉर्ड मोडणार का पठाण? जगभरात फक्त शाहरुखचीच हवा, ९ दिवसांत सिनेमानं कमवले इतके कोटी

19

मुंबई : सिद्धार्थ आनंद दिग्दर्शित पठाण सिनेमा प्रदर्शित होऊन नऊ दिवस झाले आहेत. या नऊ दिवसांमध्ये सिनेमानं सातत्यानं दणदणीत कमाई केली आहे. नऊ दिवसांमध्ये वर्ल्डवाईड सिनेमाची कमाई ७०० कोटी रुपयांच्या उंबरठ्यावर आहे. हा सिनेमा लवकरच हा आकडा पार करेल. शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांची प्रमुख भूमिका असलेल्या पठाण सिनेमानं गुरुवारपर्यंत वर्ल्डवाईड ६९६ कोटी रुपये बॉक्स ऑफिसवर कमावले आहेत. त्याचबरोबर परदेशातही २६० कोटी रुपयांहून अधिक कमावले आहेत. पठाण सिनेमानं नऊ दिवसांत म्हणजे गुरुवारी २९ कोटी रुपये वर्ल्डवाईड कमावले आहेत. त्यामध्ये १५ कोटी रुपये भारतीय बाजारात हिंदी व्हर्जनमधून आले आहेत. म्हणजे परदेशात गुरुवारी पठाण सिनेमानं सरासरी १४ कोटी रुपये कमावेल आहेत.

यशराज फिल्मची निर्मिती असलेला पठाण हा आजमितीला सर्वाधिक यशस्वी सिनेमा ठरला आहे. २५० कोटी रुपयांमध्ये तयार झालेल्या या सिनेमानं ‘एक था टाइगर’, ‘टाइगर जिंदा है’ आणि ‘वॉर’ सिनेमांनी केलेल्या एखूण कमाईला मागं टाकलं आहे. निर्मात्यांनी दिलेल्या ताज्या आकडेवारीरनुसार पठाण सिनेमानं देशात हिंदी, तमिळ, तेलुगु भाषांमध्ये मिळून एकूण ४३६ कोटी रुपये कमावेल आहेत. तर नेट बॉक्स ऑफिस कलेक्शन देशात ३६४.०५ कोटी रुपये आहे. त्यात हिंदी व्हर्जनमधून देशात ३४८.५५ कोटी रुपयांची घसघशीत कमाई झाली आहे.

‘पठाण’ची आठव्या दिवशीची वर्ल्डवाईड कमाई

  • ९ व्या दिवशी वर्ल्‍डवाइड ग्रॉस कलेक्‍शन- ६९६ कोटी रुपये
  • ९ व्या दिवशी देशातील ग्रॉस कलेक्‍शन- ४३६ कोटी रुपये
  • ९ व्या दिवशी परदेशातील ग्रॉस कलेक्‍शन- २६० कोटी रुपये
  • ९ व्या दिवशी हिंदीमधील नेट कलेक्‍शन- ३४८.५५ कोटी रुपये
  • ९ व्या दिवशी डब व्हर्जनमधील कमाई १५ .५० कोटी रुपये
  • ९ व्या दिवशी देशातील नेट कलेक्‍शन- ६३४.०५ कोटी रुपये

पीकेचा रेकॉर्ड मोडणार का पठाण?
पठाण सिनेमानं बुधवारी वर्ल्डवाईड ३३ कोटी रुपयांची कमाई केली आहे. गुरुवारी ही कमाई २९कोटी रुपये इतकी होती. वीकडेजनंतर आलेल्या सोमवारी सिनेमाच्या कमाईत थोडी घट झाली. परंतु आता येत्या वीकेंडला सिनेमा दणदणीत कमाई करेल असा अंदाज वर्तवला जात आहे. त्यामुळेच येत्या रविवारपर्यंत पठाणची एकूण कमाई ८००कोटींच्या घरात जाईल असा अंदाज व्यक्त केला जात आहे.ही कमाई इतर कोणत्याही भारतीय सिनेमापेक्षा अधिक तर आहेच शिवाय अतिशय वेगवानही आहे. खास करून याआधी दंगल, बाहुबली २, केजीएफ २, आरआरआर हे सिनेमा परदेशी भाषांमध्ये डब होऊन प्रदर्शित झाले होते. मात्र पठाणबाबत असं होण्याची शक्यता नाही.

रजनीकांतच्या २.० चा तुटला रेकॉर्ड
शुक्रवारी दहाव्या दिवशी पठाणनं रजनीकांत आणि अक्षय कुमार यांच्या २.० सिनेमानं केलेल्या कमाईला मागं टाकलं आहे. २.० सिनेमानं सर्व भाषांमध्ये मिळून वर्ल्डवाईड ६९९.८९ कोटी रुपयांची कमाई केली आहे. तर येत्या वीकेंडला हा सिनेमा आमिर खान पीके सिनेमानं लाइफटाइम कमाई ७५०.५९ कोटी रुपयांचा आकडा पार करेल. पठाणच्या पुढे आता ‘सीक्रेट सुपरस्‍टार’ (८५८.४२ कोटी रुपये) आणि ‘बजरंगी भाईजान’ (९१०.५९कोटी रुपये) असणार आहे.

युकेमध्ये ऐतिहासिक कमाई, अमेरिका/कॅनडामध्ये तगडं कलेक्शन
शाहरुख खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम याचा ‘पठान’ मध्ये मुख्य भूमिका आहेत. तर सलमान खान पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत आहे. या सिनेमानं अमेरिका, कॅनडा, न्यूझीलंड, दुबई आणि आखाती देशांमध्ये खूप चांगली कमाई करत आहे. तर युकेमध्ये देखील या सिनेमानं ऐतिहासिक कमाई केली आहे.

शहजादा पुढे गेल्याचा पठाणला फायदा
पठाणमुळे कार्तिक आर्यनचा शहजादा सिनेमाचं प्रदर्शित होणं पुढं ढकललं आहे. हा सिनेमा १० फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे पठाण सिनेमाला पुढच्या शुक्रवारपर्यंत चांगली कमाई करण्याची संधी आहे. आता पठाण सिनेमाचा विजयीरथ कुठपर्यंत जाते याची सगळ्यांना उत्सुकता आहे. हा सिनेमा दंगल, बाहुबली २, केजीएफ २ आणि आरआरआरचा रेकॉर्ड तोडत सर्वाधिक कमाई करणारा भारतीय सिनेमा ठरणार का याचीच उत्सुकता आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.