Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पुणे गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळ यांच्यावतीने IHLMS २.० या नवीन सॉफटवेअर प्रणालीमुळे सामान्य नागरिकांना घरबसल्या वेबसाईट किंवा मोबाईल अॅपच्या माध्यमातून रजिस्टेशन , अर्ज भरणे व ऑनलाईन पेमेंट या सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे अर्ज करताना निर्माण झालेला संभम्र व येणा-या अडचणी शंकाचे निरसन होऊन जास्तीत जास्त अर्ज करता यावेत तसेच सामान्य नागरिकांकडून येणा-या प्रतिसादामध्ये मुदतवाढ मिळावी अशी विचारणा व विनंती वांरवार करण्यात येत आहे. करिता पुणे मंडळ म्हाडाच्या जानेवारी- २०२३ ऑनलाईन सोडतीच्या ऑनलाईन रजिस्ट्रेशनकरित २५ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ देण्यात आलेली आहे.
पुणे मंडळामार्फत काढण्यात येणा-या या ऑनलाईन सोडतीमध्ये कलाकार, स्वातंत्र्यसैनिक, आमदार / खासदार आरक्षण असणा-या व्यक्तींना सदर आरक्षण प्रमाणपत्र मिळण्याकरिता वारंवार येणा-या अडचणी लक्षात घेऊन प्रमाणपत्र सादर करणेकरिता सूट देण्यात आली आहे. सदर अर्जदारांनी घराचा ताबा घेतेवेळी सदर आरक्षण प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील.
तुरीच्या दरात चढ उतार सुरु, कापसाचे दर स्थिरावले, राज्यात ‘या’ ठिकाणी सर्वाधिक दर
सोडतीची तारीख ठरली
सदनिकांची ऑनलाइन सोडत गृहनिर्माण मंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हस्ते आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली, प्रधान सचिव वल्सा नायर सिंह आणि उपाध्यक्ष अनिल डिग्गीकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ७ मार्चला पार पडणार आहे.
सोडत ऑनलाइन होणार
ही ऑनलाइन सोडत ही संपूर्णपणे पारदर्शी असून, म्हाडाने कोणत्याही एजंटची नेमणूक केलेली नाही. संगणकीय सोडतीमध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होऊ शकत नाही. त्यामुळे अर्जदारांनी अर्जदारांनी म्हाडा मार्फत राबविण्यात येणाऱ्या सदर ऑनलाइन सोडतीचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, अशी माहिती मुख्य अधिकारी नितीन माने-पाटील, पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळ, पुणे यांनी दिली.
रगडेंच्या सांचीवर लंडनच्या एडवर्डचं ‘लव्ह’, औरंगाबादेत थाटात लग्न, मिस्टर क्लेश म्हणाले…
वेळापत्रक
ऑनलाइन नोंदणीचा अंतिम दिनांक : २५ फेब्रुवारी
अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख : २६ फेब्रुवारी
ऑनलाइन शुल्क जमा करण्याची मुदत : २७ फेब्रुवारी
बँकेत अनामत रक्कम जमा करणे : २८ फेब्रुवारी
सोडतीची प्रारुप यादी : ३ मार्च २०२३
सोडतीसाठी अर्जांची अंतिम यादी : ५ मार्च
ड्रायरन : ६ मार्च
सोडत म्हाडा कार्यालय आणि यशस्वी अर्जदार आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्धी : ७ मार्च २०२३
शाहिद आफ्रिदीच्या मुलीचा ‘शाही’न लग्न सोहळा, व्हिडिओ झाला जगभरात व्हायरल…. 97489390