Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

१००० रुपयांपेक्षा कमीमध्ये खरेदी करा Redmi Note 11 SE, पाहा ही शानदार डील

46

नवी दिल्ली: REDMI Note 11 SE Offers: रेडमी स्मार्टफोन प्रत्येक बाबतीत चांगलेच लोकप्रिय असून अनेक युजर्स या कंपनीचे स्मार्टफोन्स खरेदी करण्यास प्राध्यान्य देतात. या फोन्सची किंमतही कमी आणि युजर्सच्या बजेटमध्ये असते. किंमत कमी असली तरी, स्पेसिफिकेशनच्या बाबतीत स्मार्टफोन्स महागड्या फोन्सना टक्कर देतात. तुम्हीही नवीन फोन खरेदी करण्याच्या विचारात असाल आणि बजेट कमी असेल तर, काळजी नको, आज आम्ही अशाच एका Redmi स्मार्टफोनबद्दल सांगणार आहो,ज्याची किंमत खूप कमी आहे.

वाचा: जिओचे स्वस्तात मस्त प्लान्स, १५० GB पर्यंत डेटा, Netflix आणि Prime Video देखील मोफत

REDMI Note 11 SE किंमत :

REDMI Note 11 SE (Cosmic White, 64 GB) (6 GB RAM) बर्‍यापैकी ट्रेंडमध्ये आहे. या फोनची MRP १६,९९९ रुपये आहे आणि तुम्ही २९ % डिस्काउंटनंतर ११,९९९ रुपयांना खरेदी करू शकता. यासोबतच तुम्हाला अनेक बँक ऑफर्सही मिळू शकतात. फ्लिपकार्ट अॅक्सिस बँक कार्डवरून पेमेंट केल्यावर तुम्हाला ५% कॅशबॅक मिळू शकतो. तसेच, यावर तुम्हाला 5 हजार रुपयांची वेगळी सूट मिळू शकते.

वाचा: WhatsApp कॉल्सची मजा होईल दुप्पट, नवीन शॉर्टकट आहे जबरदस्त

REDMI Note 11 SE: एक्सचेंज ऑफर

एक्सचेंज ऑफर अंतर्गत स्वतंत्र सूट देखील मिळवू शकता. जुना स्मार्टफोन फ्लिपकार्टवर एक्स्चेंज करून तुम्ही ११,४५० रुपयांची सूट मिळवू शकता. पण, ऑफरची किंमत जुन्या फोनची स्थिती आणि मॉडेल यावरही अवलंबून असेल. कंपनीकडून फोनची १ वर्षाची वॉरंटी दिली जात आहे. याशिवाय अॅक्सेसरीजला ६ महिन्यांची वेगळी वॉरंटी मिळत आहे.

REDMI Note 11 SE चे फीचर्स आहेत जबरदस्त:

स्पेसिफिकेशनच्या बाबतीतही हा फोन खूपच चांगला सिद्ध होऊ शकतो. या फोनमध्ये ६.४३ इंचाचा फुल HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे. यात क्वाड रियर कॅमेरा देखील आहे, ज्याचा प्रायमरी कॅमेरा ६४ MP आहे. फ्रंट कॅमेर्‍याबद्दल बोलायचे झाले तर, यात १३ MP फ्रंट कॅमेरा देखील देण्यात आला आहे. फोनमध्ये ५००० mAh पॉलिमर बॅटरी देखील देण्यात आली आहे.

वाचा: या टिप्सच्या मदतीने वाढवा फोनचा बॅटरी बॅकअप, पाहा डिटेल्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.