Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आला Coca Cola स्मार्टफोन! देशात प्री-बुकिंगला सुरुवात

4

नवी दिल्लीः जर तुम्ही कोका कोलाचे चाहते असाल तर तुमच्यासाठी रियलमीने एक खास स्मार्टफोन आणला आहे. ज्याला Realme 10 Pro Coca Cola Edition असे नाव दिले आहे. या फोनची डिझाइन खूपच खास आहे. फोन रेड आणि ब्लॅक कलर पॅटर्न मध्ये येते. जी दिसायला खूपच शानदार आहे. Realme 10 Pro Coca Cola Edition काल दिल्लीत अनवील करण्यात आला आहे. परंतु, Realme 10 Pro 5G Coca Cola Edition लाँचिंग १० फेब्रुवारी रोजी होणार आहे. तर या फोनची प्री बुकिंग सुरू केली आहे. कंपनीच्या अधिकृत साइटवरून याला बुक केले जावू शकते. प्री बुक करणाऱ्या ग्राहकांना २०० रुपयाचे कूपन, इलेक्ट्रिक टूथब्रश, रियलमी वॉच २ आणि ३ वॉटचे ब्लूटूथ स्पीकर सुद्धा मिळेल.

काय आहेत स्पेसिफिकेशन्स
या फोनमध्ये जास्त बदल पाहायला मिळणार नाही. परंतु, तुम्ही जर कोका कोलाचे चाहते असाल तर तुमच्यासाठी हा फोन खास आहे. कारण, या फोनची डिझाइन खूप शानदार आहे. Realme 10 Pro स्मार्टफोन मध्ये ६.७ इंचाचा फुल एचडी प्लस एलसीडी डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 120 HZआहे. यामुळे फोन खूपच फास्ट आणि स्मूथ होतो. तर ब्राइटनेससाठी 680 nits सपोर्ट दिले आहे. Realme 10 Pro Coca Cola Edition स्मार्टफोन फिंगरप्रिंट सेंसर पॉवर बटन सोबत येते.

वाचाः ६ फेब्रुवारीला भारतात येतोय पोकोचा नवा स्मार्टफोन, पॉवरफुल फोनची किंमत किती?

Realme 10 Pro स्मार्टफोनच्या रियर पॅनेरवर १०८ मेगापिक्सलचा मेन कॅमेरा मिळेल. सोबत २ मेगापिक्सलचा पोर्ट्रेट कॅमेरा सेन्सर सपोर्ट दिला आहे. तर सेल्फी साठी या फोनच्या फ्रंट मध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा सेन्सर दिला आहे. Realme 10 Pro स्मार्टफोन मध्ये Snapdragon 695 चिपसेट सपोर्ट दिले आहे. फोन ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज सोबत येते. पॉवर साठी या फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. जी 33W SuperVOOC चार्जिंग सपोर्ट सोबत येते.

वाचाः Flipkart Sale: १० हजाराचा स्मार्ट टीव्ही खरेदी करा फक्त ९९९ रुपयात?

वाचाः Samsung Galaxy S23 सीरीज लाँच, दीड लाखाचा स्मार्टफोन iPhone 14 ला टक्कर देणार?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.