Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बँकर होत्या वाणी जयराम, पतीच्या हट्टामुळे झाल्या प्रोफेशनल गायिका; पटकावले ३ राष्ट्रीय पुरस्कार

5

मुंबई: प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांचं निधन झालं आहे. चेन्नईमधील राहत्या घरी वाणी जयराम यांचा मृतदेह आढळून आला. दरम्यान त्यांच्या डोक्याला जखम होती असल्याचीही माहिती समोर आली. पोलिसांनी त्यांच्या मृत्यूबद्दल अद्याप काहीही सांगितलेलं नाही. वाणी यांना याचवर्षी पद्म पुरस्कार जाहीर झाला होता. ७८ वर्षांच्या वाणी जयराम यांनी कन्नड, तमिळ, हिंदी,तेलुगु, मल्याळम, मराठीसह १९ भारतीय भाषांमध्ये १० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत. त्यात ३३९ गाणी १०० सिनेमांतील आहेत.

वाणी यांचा पहिला हिंदी सिनेमा ‘गुड्डी’ हा होता. त्या सिनेमातील ‘हमको मन की शक्ती देना’ हे प्रसिद्ध गाणं त्यांनी गायलं. हे गाणं आजही अनेक शाळांमध्ये प्रार्थनागीत म्हणून म्हटलं जातं. वाणी जयराम यांना तीनवेळा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. त्याचं खरं नाव कलैवनी होतं. वाणी यांनी आठव्या वर्षापासून ऑल इंडिया रेडिओसाठी गाणं गायला सुरुवात केली. त्यानंतर वाणी अनेक वर्षे भारतीय स्टेट बँकेत काम करत होत्या.

हे वाचा-राहत्या घरात आढळला ज्येष्ठ गायिका वाणी जयराम यांचा मृतदेह

तमिळनाडूमधील वेल्लोर इथं ३० नोव्हेंबर १९४५ मध्ये वाणी यांचा जन्म झाला. वाणी यांना सहा बहिणी आणि तीन भाऊ होते. त्यांचे आईवडील दुरईसामी अय्यंगार आणि पद्मावती संगीतविश्वात कार्यरत होते. वाणी यांच्या पालकांनी रंगा रामुनाजा अय्यंगार शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेतलेलं. वाणी यांनीही लहानपणापासून शास्त्रीय संगीतचं शिक्षण घेतलं होतं. वाणी यांना लहानपणापासूनच रेडिओ ऐकण्याची खूप आवड होती. त्यातही त्यांना हिंदी गाणी ऐकण्याची जास्त आवड होती.

स्टेट बँकेत करायच्या नोकरी

वाणी लहान असताना सिलोन चॅनेलवर हिंदी गाणी ऐकायच्या. त्यानंतर त्या सतत ती गाणी गुणगुणायच्या. वाणी जेव्हा आठ वर्षांच्या होत्या तेव्हापासून त्या मद्रास इथल्या ऑल इंडिया रेडिओवर गाणी गायच्या. मद्रास युनिव्हर्सिटीमधील क्वीन मेरी कॉलेजमधून त्यांनी शिक्षण पूर्ण केलं. त्यानंतर वाणी जयराम अनेक वर्षे भारतीय स्टेट बँकेमध्ये नोकरी केली. त्यासाठी त्या चेन्नई आणि नंतर हैदराबाद इथं होत्या.

वाणी जयराम याचं लग्न संगीताची आवड असलेल्या कुटुंबात झालं. त्यांची सासू पद्मा स्वामीनाथन प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या होत्या तसंच कर्नाटक संगीतामधील गायिका होत्या. १९६९ मध्ये वाणी यांनी जयराम यांच्याशी लग्न झालं. लग्नानंतर वाणी त्यांच्या नवऱ्याबरोबर मुंबईला आल्या. तेव्हा देखील त्या बँकेत काम करत होत्या. परंतु त्यांचे पती जयराम जेव्हा वाणी यांचे गाणी ऐकायचे तेव्हा आपल्या बायकोनं गाण्याचं शास्त्रशुद्ध शिक्षण घ्यावं असा त्यांचा आग्रह होता. त्यामुळेच त्यांनी वाणी यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताचं प्रशिक्षण घेण्यासाठी तयार केलं. त्यानंतर वाणी पटियाला घराण्याचे उस्ताद अब्दुल रहमान खान यांच्याकडून शिक्षण घ्यायला सुरुवात केली. संगीतामध्ये वाणी यांचा रस वाढल्यानंतर त्यांनी बँकेतील नोकरी सोडली आणि पूर्णवेळ व्यावसायिक गायिका म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला.

हे वाचा-डाव उलटला! अखेर आदिल खान बोलला आणि गप्प झाली राखी, म्हणाली- आता सर्व ठीक

मराठी सिनेमांसाठी गायली गाणी

वाणी जयराम यांनी ठुमरी, गजल, भजन सारखे गाण्याचे विविध प्रकार गायले. १९६९ मध्ये त्यांनी मुंबईतील एका सार्वजनिक संगीत कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांची भेट संगीतकार वसंत देसाई यांच्याशी झाली. त्यावेळी ते कुमार गंधर्व यांच्याबरोबर एक मराठी अल्बम रेकॉर्ड करत होते. वाणी यांचा आवाज ऐकल्यानंतर वसंत देसाई यांनी कुमार गंधर्व यांच्याबरोबरच्या अल्बममध्ये ‘ऋणानुबंधाच्या’ गाण्यासाठी वाणी यांना संधी दिली. हे गाणं आणि तो अल्बम मराठीमध्ये खूप गाजला.

हृषिकेश मुखर्जीं यांच्याशी भेट

वसंत देसाई यांनी संगीतबद्ध केलेलं आणि वाणी जयराम यांनी गायलेलं हे गाणं खूपच लोकप्रिय झालं. त्यानंतर वाणी यांना हिंदीतील प्रसिद्ध दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांनी १९७१ मध्ये प्रदर्शित झालेल्या त्यांच्या गुड्डी सिनेमासाठी तीन गाणी गाण्याची संधी दिली. जया बच्चन यांची सिनेमात प्रमुख भूमिका होती. वाणी जयराम यांनी या सिनेमासाठी बोले रे पपिहरा, हरी बिन कैसे जीयूं आणि हमको मन की शक्ती देना ही गाणी गायली. ही तिन्ही गाणी लोकप्रिय झाली आणि वाणी याचं नाव हिंदी सिनेमाविश्वात लोकप्रिय झालं. हे गाणं आजही अनेक शाळांमध्ये प्रार्थनागीत म्हणून गायलं जातं. वाणी यांनी वसंत देसाई यांच्याबरोबर महाराष्ट्राचा दौरा केला आणि अनेक शाळांमध्ये जाऊन मुलांना या गाण्याबरोबरच अनेक गाणी शिकवली.

हे वाचा-शालीनची एक्स वाइफ दुसऱ्यांदा चढणार बोहल्यावर! लग्नानंतर अभिनेत्री सोडणार देश

१०० हिंदी सिनेमांत गायली ३३९ गाणी

वाणी जयराम यांनी १०० हिंदी सिनेमांसाठी ३९९ गाणी गायली. त्यात १९७२ मध्ये प्रदर्शित झालेल्या पाकिजा सिनेमातील मोरे साजन सौतन घर हे गाणं गायलं. तर आइना सिनेमासाठी आशा भोसले यांच्याबरोबर दुल्हन बडी जादूगरनी हे गाणं गायलं होतं. वाणी यांनी मदन मोहन यांचं प्यार कभी कम नहीं करना हे लोकप्रिय गाणं गायलं होतं. हे गाणं त्यांनी किशोर कुमार यांच्यासाथीं गायलं होतं. त्याचबरोबर वाणी यांनी गायलेलं मेरे तो गिरधर गोपाल हे भजन देखील लोकप्रिय झालं होतं. वाणीनं आरडी बर्मन, श्यामजी घनश्यामजी, कल्याणजी आनंदजी, मन्ना डे, जयदेव आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांसारख्या प्रसिद्ध संगीतकारांबरोबर काम केलं होतं.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.