Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

शहीद वडिलांचे स्वप्न पूर्ण करणारा भूमिपुत्र, कोल्हापुरात सैनिकाचे जल्लोषात स्वागत

5

कोल्हापूर: भारतीय सैन्य दलात भारत मातेची सेवा करताना वीरमरण आलेल्या वडिलांचे अपुरे राहिलेले स्वप्न आईच्या निर्धाराने आणि आशीर्वादाने पूर्ण करून आज एक सैनिक १७ वर्षानंतर पुन्हा आपल्या आईजवळ अभिमानाने आला आहे. नितिकेश मारुती पाटील असे सैनिकाचे नाव असून ते मुरगुड येथील ज्ञानेश्वर कॉलनी एसटी स्टँड येथील रहिवासी आहेत. यावेळी त्यांचे स्वागतही तेवढ्याच दिमाखात करण्यात आले.

सनई चौघड्यांचा आवाज, लक्षवेधी रांगोळी आणि फुलांनी सजवलेल्या जीपमध्ये सहा फूट उंचीचा भारतीय सैन्यातील पोशाख परिधान केलेल्या या भूमिपुत्राला तब्बल ५० ते ६० एनसीसी विद्यार्थ्यांकडून सॅल्यूट देत भव्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत आई छाया पाटील आपल्या मुलाकडे अभिमानाने पाहत होती.

nitikesh patil.

हेही वाचा -भाऊ विहिरीत पडला म्हणून वाचवायला गेला पण, एकाच दिवशी कुटुंबावर दोन पोरांच्या अंत्यविधीची वेळ

नितिकेश मारुती पाटील यांच्या वडिलांना १९९६ च्या काळात भारतमातेची सेवा करताना त्यांना वीरमरण आले. यावेळी नितिकेश हा अवघ्या नऊ वर्षाचा होता. मात्र, नितिकेशच्या आईच्या मनात आपल्या नवऱ्याचे देशसेवेचं अधुरे राहिलेले स्वप्न मुलाने पूर्ण करावे अशी इच्छा निर्माण झाली. आईच्या या निर्धाराने आणि शिकवणीने नितिकेश २००५ मध्ये भरती प्रक्रियेतून सैन्य दलात सामील झाला. नितिकेश मारुती पाटील यांचे कुटुंबीय मूळचे कुरुकली तालुका कागल येथील असून सध्या ते मुरगुड येथे वास्तव्यास आहेत.

नितिकेशने देशभरात मुंबई, पंजाब, हरियाणा, ओडिसा, श्रीनगर यासह अनेक ठिकाणी गेल्या सतरा वर्षांपासून देश सेवेसाठी आपले सर्वस्व अर्पण केले. यादरम्यान त्यांना अनेक अडचणींना सामना करावा लागला आणि सतरा वर्षांच्या या प्रवासानंतर त्यांनी सेवानिवृत्ती घेतली.

हेही वाचा -पाच लाख भाविकांची उपस्थिती, आंगणेवाडी जत्रा हाऊसफुल, भाजपनं टायमिंग साधलं…

नितिकेश निवृत्त होतं गावात येणार आहेत समजताच गावकऱ्यांनी देखील त्यांचे जोरदार स्वागत करण्याचे ठरवले. रस्त्यावर रांगोळीच्या पायघड्या सनई आणि हलगीचा कडकडाट याच्यासह फुलांची मुक्त उधळण करत त्यांचे मुरगुडमध्ये जंगी स्वागत करण्यात आले. एनसीसीच्या विद्यार्थ्यांकडून त्यांना सॅल्यूट दिले गेले, यानंतर नितिकेशचे औक्षण करत देशाची सेवा करत आपल्या वडिलांचे स्वप्न पूर्ण केल्याने त्यांचा सत्कार करण्यात आला.

हेही वाचा -वाढदिवसाला आजोबांचा एक सल्ला अन् १८ वर्षीय तरुणी झाली अब्जाधीश…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.