Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
वाचाः पुण्यात आईने नवजात बाळाला कालव्यात फेकलं अन् केला अपहरणाचा बनाव; मात्र ‘असा’ लागला सुगावा
या प्रकणी रजत सिन्हा, नेहा शर्मा आणि ज्या खात्यावर पैसे ट्रान्सफर झालेत ते खातेधारक अश्या सगळ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या बाबत एका ७८ वर्षीय जेष्ठ नागरिकांनी सायबर पोलीस स्टेशनला तक्रार दिली आहे. हा प्रकार २०२२ पासून सुरू होता.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी हे एका मोठ्या कंपनीतून निवृत्त झाले आहेत. ते अमेरिकेतील एका कंपनीसाठी काम करतात. त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. त्यांना एकदा नेहा शर्मा या नावाने महिलेचा फोन आला. तिने आपली के. बी. टेलिकॉम ही डेटिंग कंपनी आहे, असे सांगितले. डेटिंग सर्व्हिस देण्यासाठी त्यांच्याकडून सुरुवातीला काही पैसे ऑनलाइन भरायला सांगितले. त्यानंतर वेगवेगळी कारणे सांगून तसेच रिफंडेबल चार्जेस असल्याचे सांगून त्यांना वेगवेगळ्या खात्यांत पैसे भरायला सांगितले. त्यानुसार ते पैसे भरत गेले. त्यानंतर या महिलेने ‘हनी टॅप’मध्ये अडकविले. ‘तुमच्याशी लग्न करायला तयार आहे,’ असे सांगून त्यांना आपल्या जाळ्यात अडकविले.
वाचाः फुकटात साड्या मिळवण्यासाठी महिलांची धावपळ; चेंगराचेंगरीत चार जणींनी जीव गमावला
प्रत्यक्षात या महिलेशी त्यांची कधी भेट झाली नाही. तरीही ती सांगेल त्याप्रमाणे ते वेगवेगळ्या खात्यांत पैसे भरत गेले. मात्र आपली फसवणूक होत असल्याचं कळल्या नंतर जेष्ठाने पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर तिने व रजत सिन्हा नाव सांगणाऱ्या एका व्यक्तीने त्यांना धमकावून पैसे देण्यास भाग पाडले. आतापर्यंत त्यांनी तब्बल १ कोटी २ लाख १२ हजार रुपये भरले. आपली बदनामी होऊ नये म्हणून ते इतके दिवस पैसे देत राहिले. तरीही तिची मागणी न थांबल्याने शेवटी त्यांनी सायबर पोलिसांकडे धाव घेत फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक संगीता माळी तपास करीत आहेत.
वाचाः महिला अंघोळीला गेली, इकडे शेजाऱ्याने डाव साधत केलं भयानक कृत्य