Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

साऊथ सिनेमातील प्रसिद्ध अभिनेते काळाच्या पडद्याआड! चार दिवसात ३ दिग्गज कलाकारांचा मृत्यू

7

मुंबई: दाक्षिणात्या फिल्म इंडस्ट्रीवर पुन्हा एकदा दु:खाचा मोठा डोंगर कोसळला. अवघ्या ४ दिवसांच्या कालावधीत तीन मोठ्या व्यक्तिमत्त्वांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण साऊथ चित्रपटसृष्टी हादरुन गेली आहे. २ फेब्रुवारी रोजी दिग्दर्शक आणि अभिनेते के. विश्वनाथ यांचे निधन झाले, ४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध गायिका वाणी जयराम यांनी चेन्नईतील त्यांच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला तर आता आणखी एक धक्कादायक बातमी दाक्षिणात्य इंडस्ट्रीतून समोर आली आहे. ५ फेब्रुवारी रोजी लोकप्रिय तामिळ अभिनेते आणि दिग्दर्शक टीपी गजेंद्रन यांचे निधन झाले.ते ६८ वर्षांचे होते.

मीडिया रिपोर्टनुसार, टीपी गजेंद्रन हे वयोमानाशी संबंधित आरोग्य समस्यांमुळे गेल्या बऱ्याच दिवसांपासून आजारी होते. या आजारपणामध्येच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांना किडनीचाही त्रास होता. यासंबंधित उपचार घेऊन ते ४ फेब्रुवारी रोजी घरी परतले, पण दुसऱ्याच दिवशी त्यांची प्राणज्योत मालवली.

हे वाचा-कॅन्सरला हरवलं पण मेंदू आणि हृदयासमोर हरली; पंचविशीत अभिनेत्रीला मृत्यूने गाठलं

तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे जवळचे मित्र होते गजेंद्रन

गजेंद्रन हे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांचे जवळचे मित्र होते. दोघांनीही महाविद्यालयीन शिक्षण एकत्रच घेतलेले. कॉलेजच्या दिवसापासून गजेंद्रन आणि स्टॅलिन यांची घनिष्ठ मैत्री होती. गजेंद्रन यांच्या निधनाने एमके स्टॅलिन यांना मोठा धक्का बसला, त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी ते तात्काळ अभिनेत्याच्या घरीही पोहोचले होते. काही दिवसांपूर्वी स्टॅलिन यांनी गजेंद्रन यांची भेटही घेतली होती.

१०० हून अधिक सिनेमांमध्ये केलंय काम

टीपी गजेंद्रन हे विनोदी कलाकार होते. १९८५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘चिदंबरा रहस्यम’ या चित्रपटातून त्यांनी अभिनेता म्हणून पदार्पण केले. त्यांनी १९८८ मध्ये ‘वीदू मानवी मक्कल’ या चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण केले. दोन दशकांच्या कारकिर्दीत, गजेंद्रन यांनी १५ हून अधिक विनोदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले, तर १०० हून अधिक चित्रपटांमध्ये काम केले होते. गजेंद्रन शेवटचे गेल्याच वर्षी ‘पन्नी कुट्टी’ सिनेमात दिसले होते.

हे वाचा-बँकर होत्या वाणी जयराम, पतीच्या हट्टामुळे झाल्या प्रोफेशनल गायिका

दाक्षिणात्य सिनेसृष्टीने ४ दिवसात गमावले ३ दिग्गज कलाकार

गजेंद्रन यांच्याआधी ०४ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध पार्श्वगायिका वाणी जयराम यांचे निधन झाले. वयाच्या ७८ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. चेन्नई याठिकाणी असणाऱ्या राहत्या घरी त्यांचा मृतदेह आढळला होता. जयराम यांना अलीकडेच ‘पद्मभूषण’ या भारतातील तिसऱ्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी कन्नड, तामिळ, हिंदी, तेलुगू, मल्याळम आणि मराठीसह १९ भारतीय भाषांमध्ये १० हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.

दरम्यान त्यापूर्वी तेलुगू सिने इंडस्ट्रीतील लोकप्रिय दिग्दर्शक के. विश्वनाथ यांनी २ फेब्रुवारी रोजी अखेरचा श्वास घेतला. ते उत्तम अभिनेतेही होते. त्यांना २०१६ मध्ये दादासाहेब फाळके पुरस्कार आणि १९९२ साली ‘पद्मश्री’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत १० फिल्मफेअर पुरस्कार, पाच राष्ट्रीय पुरस्कार आणि पाच नंदी पुरस्कार जिंकले आहेत.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.