Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बीआरएस पक्षाची राज्याच्या राजकारणात एंट्री, चार माजी आमदारांचा प्रवेश, मोदींना ललकारले

14

नांदेड : तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समिती या पक्षाने महाराष्ट्राच्या राजकारणात एंट्री केली आहे. मोठी गर्दी झालेल्या राव यांच्या जाहीर सभेत राज्यातील दोन माजी आमदारांनी प्रवेश केला. यात गडचिरोलीचे माजी आमदार दीपक आत्राम, उदगीरचे आमदार मोहन पटवारी आणि यवतमाळचे माजी आमदार राजू तोडसाम, ठाण्याचे दिगंबर भिसे यांचा समावेश आहे. तसेच संभाजी ब्रिगेड किसान आघाडीचे प्रदेशाध्यक्ष संतोष गव्हाणे, ढोलीराम काळदाते आदी नेत्यांनी बीआरएस पक्षात प्रवेश करत पक्षाच्या राज्यातील प्रवेशावर एकप्रकारे शिक्कामोर्तब केला. जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री राव यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकारसह महाराष्ट्रातील सरकावरलाही आपल्या टीकेचे लक्ष्य केले.

के. चंद्रशेखर राव यांच्या बीआरएश पक्षाची जाहीर सभा आज नांदेडमध्ये पार पडली. या सभेला मोठी गर्दी जमली होती. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्र सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. तसेच त्यांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या या कळीच्या मुद्द्यालाही हात घातला.

आगामी निवडणुकीमध्ये शेतकऱ्यांनी एकजूट दाखवा. महाराष्ट्राच्या सरकारला झुकावेच लागेल. शेतकऱ्यांनी दिल्लीच्या सीमांवर आंदोलन केले. त्यावर मोदी सरकराने एक शब्दही काढला नाही. त्यामुळे भाजप सरकारला शेतकऱ्यांची काहीच चिंता नसल्याची टीका केसीआर यांनी नांदेडमध्ये बोलताना केली.

क्लिक करा आणि वाचा- मन सुन्न करणारी घटना! १० वर्षांपूर्वी वडिलांना संपवले, आता आईलाचाही घेतला जीव, पेंशनसाठी मुलगा बनला हैवान

आत्महत्येचे दु:ख

भारत राष्ट्र समितीने रविवारी नांदेडमध्ये मोठी रॅली काढली. तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी जाहीर सभेला संबोधित करताना केंद्र सरकारवर जोरदार हल्ला चढवला. ते म्हणाले की, स्वातंत्र्याच्या इतक्या वर्षानंतरही लोकांना ना पिण्यासाठी पाणी मिळत आहे, ना सिंचनासाठी. इतकी सरकारे आली आणि गेली त्यांनी काय केले? हा सर्वात मोठा प्रश्न असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. महाराष्ट्रात शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या याचे खुप दु:ख वाटते असे देखील राव म्हणाले.

अब की बार किसान सरकार- राव यांची घोषणा

पुढे बोलतांना राव म्हणाले की, ‘अब की बार किसान सरकार’ येणार आहे. आता आपल्याला राष्ट्रीय स्तरावर जायचे आहे. देशात मोठ्या बदलाची गरज आहे. बरेच लोक येतात, लांबलचक भाषणे देऊन निघून जातात. मात्र ७५ वर्षांनंतरही देशाला पाणी, वीज मिळत नाही. ही खरी शोकांतीका आहे असे मत त्यांनी मांडले. राजकीय नेते फक्त भाषण देण्यात व्यस्त आहेत. त्यांना शेतकऱ्यांचे प्रश्न दिसत नाही. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नसल्याची टीका त्यांनी मोदी सरकारवर केली आहे.अब की बार किसान सरकारचा नारा : केसीआर यांनी रॅलीपूर्वी सांगितले होते की, त्यांच्या सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या कल्याणकारी, विकास योजनांमुळे शेजारील राज्यातील अनेक गावे तेलंगणामध्ये विलीन होऊ इच्छित आहेत. २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत बीआरएसचा नारा ‘अब की बार किसान सरकार’ असेल, असे राव यांनी नुकतेच सांगितले होते.

क्लिक करा आणि वाचा- लग्न झाले, धुमधडाक्यात वरातही निघाली, नवरीच्या चेहऱ्यावरील पदर उचलताच नवऱ्याच्या पायाखालची जमीन सरकली

तेलंगणाबाहेर पहिलीच जाहीर सभा

तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी आज प्रथमच राज्याबाहेर जाहीर सभेला संबोधित केले. भारत राष्ट्र समिती (BRS) या नवीन पक्षाची अध्यक्ष म्हणून स्थापना केल्यानंतर, KCR आपल्या राजकीय कारकिर्दीची नवी इनिंग सुरू करण्यासाठी महाराष्ट्रातील नांदेड शहरात जाहीस सभा घेतली. यासह पक्ष विस्तारासाठी त्यांनी सुरुवात केली आहे. त्यांच्या पक्षाचे नाव बदलून बीआरएस केल्यानंतर राव यांची तेलंगणाबाहेरील ही पहिलीच जाहीर सभा होती.

नांदेड, महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येने तेलुगू भाषिक लोक राहतात. त्यामुळे मोठ्या संख्येने स्थानिक लोक जाहीर सभेत सहभागी झाले होते, असा पक्षाचा दावा आहे. चंद्रशेखर राव यांचेअनेक मंत्री गेल्या दोन दिवसांपासून नांदेडमध्ये तळ ठोकून होते. यानिमित्ताने नांदेड शहर चांगलेच सजले होते. शहरात अनेक किलोमीटरपर्यंत गुलाबी तोरण लावण्यात आले होते. यासोबतच मोठमोठे होर्डिंग, फुगे, स्टिकर्स लावून लोकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला जात होता.

क्लिक करा आणि वाचा- इच्छेविरुद्ध लग्न, पती १७ वर्षांनी मोठा, पत्नीने प्रियकरासाठी पतीला संपवले, पतीच्याच मोबाइलवर शोधले मार्ग

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.