Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
मध्यंतरी कीर्तनकार इंदुरीकर महाराज यांचे काही आक्षेपार्ह विधान सोशल मीडियावर व्हायरल झालं होतं. यामुळे इंदुरीकर महाराज प्रचंड ट्रोल झाले होते. या प्रकरणी भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी वादाची मोठी राळ उठवली होती. महाराजांचे अनेक जुने व्हिडिओ काढून इंदुरीकर महाराजांवर जोरदार टीका करण्यात आली होती. त्यानंतर इंदुरीकर महाराज यांनी काही काळ विश्रांती घेतली. मात्र, महाराजांचा एक कार्यक्रम आज पुण्यात आयोजित केला होता. आणि या कार्यक्रमात शरद पवार हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले होते. शरद पवारांनी या कार्यक्रमात जाहीरपणे बोलून दाखवलं. इंदुरीकर महाराजांचं कीर्तन बघायला आवडतं, असं पवारांनी सांगितलं.
पुण्यातील निवडणुकांचं चित्र पालटणार? राज ठाकरेंची मोक्याची क्षणी महत्त्वाची भूमिका,
‘दिल्लीमध्ये उद्या अधिवेशन सुरू होत आहे. सकाळी सुरू होत आहे. हिवाळ्याच्या वातावरणामुळे सकाळचे फ्लाइट कॅन्सल होतात. म्हणून घाईगर्दीत मला आताच निघावं लागेल. नाही तर मला इंदुरीकर महाराजांचं कीर्तन ऐकायची इच्छा होती. त्यांच्या कीर्तनामध्ये गमती असतात. मी अनेकदा ते टीव्हीवर पाहात असतो. याची अॅक्शन कर, त्याची दिशा काढ, त्यांची टाळ, नृत्य बदल. आता सागळ्या गोष्टी सांगत नाही’, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार म्हणाले.
राज्यात वडील पळवायची शर्यत; रेकॉर्ड करून ठेवा, शरद पवार हे माझेच वडील आहेत : सुप्रिया सुळे
‘पण एक जनमाणसांमध्ये सहजपणे चांगले संस्कार कसे करता येईल, सहज विचार कसे राबवता येतील? याचं उत्तम उदाहरण कीर्तनकार इंदुरीकर महाराज. आणि याचं लोणी महाराष्ट्रमध्ये सामान्य माणसांपर्यंत पोहचलं आहे. आजही या ठिकाणी मला त्यांचा कार्यक्रम ऐकण्याची संधी मिळाली नाही. पण त्याचा लाभ मी पुन्हा घेतल्याशिवाय राहणार नाही’, असं शरद पवार यांनी सांगितलं.