Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

लतादीदींना गमावल्याच्या दु:खातून सावरले नाहीत हृदयनाथ; मंगेशकर कुटुंबाने गाजराचा हलवा खाणंही सोडलं

8

मुंबई: ०६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतीय संगीतविश्वाचे न भरून निघणारे नुकसान झाले होते. यादिवशी गानकोकिळा लता मंगेशकर यांनी वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. आज लतादीदींचा प्रथम स्मृतिदिन आहे. लतादीदी जाण्याचं दु:ख अवघं संगीतविश्व, त्यांचे चाहते, कुटुंबीय आणि मित्रपरिवार अद्यापही विसरू शकले नाहीत. त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दु:खाची तर कल्पनाच करणं शक्य नाही. दरम्यान लतादीदींच्या आठवणींना त्यांची बहीण उषा मंगेशकर यांनी उजाळा दिला. उषा मंगेशकर लतादीदींसोबतच राहायच्या आणि त्यांचे बंधू हृदयनाथही.

उषा यांनी दिलेल्या या मुलाखतीमध्ये असे म्हटले की कधी घरात असे वाटतच नाही की आता लतादीदी आपल्यात नाहीत. त्या आजही आमच्याबरोबर आहेत. दैनिक भास्करशी बोलताना त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.

हे वाचा-सिगारेट फॉइलवर लिहिलेल्या ‘ए मेरे वतन’च्या ओळी; वाचा लता दीदींच्या अजरामर गीताची कहाणी

उषा यांनी यावेळी बोलताना असे म्हटले की त्यांचे लतादीदींना त्यांच्या भावाबद्दल खूप आपुलकी होती आणि तेवढाच जीव हृदयनाथ यांचाही लतादीदींवर होता. उषा यांनी बोलताना सांगितले की, दीदींच्या निधनामुळे भाऊ हृदयनाथ एक वर्षापासून धक्क्यातून सावरले नाहीत. दीदी खूप छान जेवण बनवायच्या, गाजराचा हलवा ही त्यांची खासियत होती. उषाजींनी सांगितले की, त्यांच्या जाण्यानंतर आम्ही सर्वांनी गाजराची हलवा खाणे बंद केले आहे. गाजराची हलवा आता कधीच आमच्या घरात खाल्ला जाणार नाही.

धक्क्यातून सावरले नाहीत हृदयनाथ

लतादीदींच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबाची परिस्थिती कशी होती, याविषयी बोलताना उषा म्हणाल्या की, ‘दीदींचे सर्वाधिक प्रेम भाऊ हृदयनाथ यांच्यावर होते. त्यांच्या प्रतीभेला दीदी खूप मान देत असत. भावाच्या पायाच्या दुखण्यामुळेही दीदींना खूप त्रास व्हायचा. दीदी आजही त्यांच्यासोबत आहेत.’ उषाजींनी सांगितले की या धक्क्यातून हृदयनाथ यांना सावरणं कठीण जात आहे. गेल्या वर्षभरापासून ते आजारी असून सर्व कुटुंब त्यांना या धक्क्यातून सावरायला मदत करतंय.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.