Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भारतातील ग्राहकांना आता Apple चे हे दोन लॅपटॉप खरेदी करता येणार नाहीत!

12

नवी दिल्लीः Apple ने आपले दोन मॅकबुक प्रो मॉडलला बंद केले आहे. MacBook Pro 14 इंच आणि MacBook Pro 16 इंचाच्या मॉडलला बंद करण्यात आले आहे. या दोन्ही मध्ये M1 Pro आणि M1 Max चिपसेट दिले होते. या दोन्ही चिपसेटला दोन्ही लॅपटॉप सोबत २०२१ मध्ये लाँच केले होते. सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास Apple ने M1 Pro आणि M1 Max चिपसेटच्या MacBooks ची विक्री आता बंद केली आहे.

Apple ने आपल्या इंडिया ऑनलाइन स्टोरवरून सुद्धा याला हटवले आहे. परंतु, तुम्ही M1 Pro आणि M1 Max चिपसेटच्या मॅकबुकला खरेदी करू शकता. याची विक्री सध्या अखेरचा स्टॉक संपेपर्यंत क्रोमा, रिलायन्स डिजिटल आणि Imagine Store सारख्या रिटेल स्टोरवर होत आहे.

१६ इंचाच्या MacBook Pro मध्ये ५१२ जीबी स्टोरेज मिळणार आहे. परंतु, तुम्ही १ टीबी पर्यंत स्टोरेजचे मॉडल सुद्धा निवडू शकता. १६ इंचाच्या MacBook Pro, M2 Pro चिपसेट ची २ लाख ४९ हजार ९०० रुपये किंमत आहे. M2 Pro चिपच्या मॅकबुक M1 Pro च्या तुलनेत महाग आहे.

वाचाः फोनवर फक्त एक मेसेज पाठवून लोकांच्या अकाउंटमधून काढले जाताहेत पैसे, या चुका टाळा

गेल्या महिन्यात Apple ने 14 इंच आणि 16 इंचाच्या साइज मध्ये MacBook Pro ला लाँच केले आहे. मॅकबुक शिवाय, अॅपलने Mac mini डेस्कटॉप कंप्यूटर सुद्धा आणले आहे. ज्यात M2 सीरीजचे प्रोसेसर दिले आहे. १४ इंच आणि १६ इंचाच्या MacBook Pro (2023) मॉडलला नुकतेच लाँच करताना M2 Pro आणि M2 Max प्रोसेसर सोबत आणले आहे. तर Mac mini मध्ये M2 CPU आहे. आणि M2 Pro सीपीयूचा ऑप्शन उपलब्ध आहे.

वाचाः ७ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ३२ इंचाचा टीव्ही, या साइटवरून खरेदी करा

१४ इंच साइज आणि M2 Pro CPU सोबत 10 CPU कोरच्या MacBook Pro ची किंमत १ लाख ९९ हजार ९०० रुपये आहे. यात १६ जीबी रॅम मिळेल. परंतु, यात ३२ जीबीचे कंफिगर केले जावू शकते. यात ५१२ जीबीचे एसएसडीचे स्टोरेज मिळेल. ज्याला 1TB, 2TB, 4TB आणि 8TB मध्ये कंफिगर केले जावू शकते.

वाचाः यापेक्षा स्वस्त काय हवं? ९७ रुपयात संपूर्ण महिनाभर अनलिमिटेड कॉलिंग आणि डेटा

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.