Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
iPhone 14, 14 Plus Valentine’s Day Offer
आयफोन १४ ला भारतात १२८ जीबी स्टोरेज सोबत ७९ हजार ९०० रुपये किंमतीत लाँच केले होते. यूजर्सला २५६ जीबी आणि ५१२ जीबी स्टोरेजचा ऑप्शन सुद्धा मिळतो. याची किंमत अनुक्रमे ८९ हजार ९०० रुपये आणि १ लाख ९ हजार ९०० रुपये आहे. आयफोन १४ ला Imagine रिटेलरद्वारे डील आणि ऑफर्स सोबत ४३ हजार ९०० रुपये किंमतीत खरेदी करू शकता.
वाचाः भारतातील ग्राहकांना आता Apple चे हे दोन लॅपटॉप खरेदी करता येणार नाहीत!
Valentine’s Day Offer
Imagine वरून सेल ऑफर अंतर्गत आयफोन १४ ला खरेदी करण्यासाठी ६ हजार रुपयाचा इंस्टेंट डिस्काउंट मिळतो. HDFC बँक कार्ड द्वारे यूजर्सला ४ हजार रुपयाचा कॅशबॅक सोबत फोन खरेदी करू शकता. यानंतर या फोनची किंमत ६९ हजार रुपये राहते. याशिवाय, ट्रेड इन ऑफर अंतर्गत आयफोन १४ ला जुन्या स्मार्टफोनच्या बदल्यात २० हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळतो.
वाचाः ७ हजारांपेक्षा कमी किंमतीत खरेदी करा ३२ इंचाचा टीव्ही, या साइटवरून खरेदी करा
iPhone 14 Plus वरील सूट
iPhone 14 Plus ला सूट सोबत खरेदी करू शकता. Imagine वरून आयफोनच्या व्हेरियंटला ७ हजार रुपयांपर्यंतची सूट मिळवता येवू शकते. HDFC बँक कार्ड सोबत ४ हजार रुपयाचा इंस्टेंट डिस्काउंट मिळतो. याशिवाय, EasyEMI ट्रान्झक्शन वर सुद्धा कॅशबॅक ऑफर क्लेम केले जावू शकते. या ऑफर नंतर प्लस व्हेरियंटला ७८ हजार ९०० रुपयापर्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. अनेक रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, आयफोन १४ प्लस मध्ये आतापर्यंत सर्व आयफोनच्या तुलनेत बेस्ट बॅटरी लाइफ दिली आहे.
वाचाः फोनवर फक्त एक मेसेज पाठवून लोकांच्या अकाउंटमधून काढले जाताहेत पैसे, या चुका टाळा
iPhone 14, iPhone 14 Plus Features
दोन्ही आयफोन १४ व्हेरियंट मध्ये १२ मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर दिले आहे. जे सेन्सर शिफ्ट स्टेबिलायझेशन सोबत येते. स्मार्टफोनमध्ये १२ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड कॅमेरा दिला आहे. सेल्फी साठी हँडसेटमध्ये १२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. जो ऑटोफोकस सपोर्ट करतो. फोनमध्ये iOS16 ऑपरेटिंग सिस्टम दिली आहे. iPhone 14 मध्ये 6.1 इंच सुपर रेटिना XDR डिस्प्ले दिली आहे.
वाचाः Airtel ने लाँच केले दोन स्वस्त प्लान, ६० जीबी पर्यंत मिळतोय डेटा, अनलिमिटेड कॉलिंग
आयफोनची फीचर्स
डिस्प्ले फ्रंट वर कॅमेरासाठी एक रुंद नॉच मिळते. iPhone 14 Plus मध्ये ६.७ इंचाचा डिस्प्ले मिळते. दोन्ही आयफोन मॉडल मध्ये ६० हर्ट्ज रिफ्रेश रेट ऑफर करते. आयफोनच्या या नॉन प्रो मॉड मध्ये ए १५ बायोनिक चिपसेट दिले आहे. या डिव्हाइस मध्ये 20W फास्ट चार्जिंग आणि 7.5W वायरलेस चार्जिंग सपोर्ट मिळतो. याशिवाय, 15W MagSafe चार्जिंग सपोर्ट मिळण्याची शक्यता आहे.
वाचाः ७ फेब्रुवारीला वनप्लसचा मोठा इव्हेंट, स्मार्टफोन, टीव्हीपासून पॅड होणार लाँच, जाणून घ्या सर्वकाही