Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

गुरुजी आणि बाई झाल्या झिंगाट, धरला सैराट चित्रपटाच्या गाण्याचा ठेका, व्हिडिओ व्हायरल

6

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील सावरोली बुद्रुक येथे नुकत्याच पार पडलेल्या माझी शिक्षण परिषदमध्ये मराठी जिल्हा परिषद शाळेतील गुरुजी व बाईंनी सैराट चित्रपटाच्या झिंग झिंग झिंगाट या गाण्यावर थिरकताना एक व्हिडियो चांगलाच व्हायरल झाला आहे. एकीकडे गुरुजी आणि बाई या गाण्याचा मनमुराद आनंद घेत असताना दुसरीकडे मात्र शिक्षकांकडून अशा प्रकारे गाण्याच्या तालावर नाचणे हि खेदजनक बाब असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे. या प्रकरणी जिल्हाधिकारी यांच्याकडे कारवाईची मागणी करणार असल्याचा इशारा देखील ग्रामस्थांकडून देण्यात आला आहे.

शासनाच्या योजनेच्या अंमलबजावणीसाठी शनिवारी ठाणे जिल्हा परिषदेच्या शहापूर पंचायत समिती शिक्षण विभागाच्या सावरोली बुद्रुक या शाळेत आयोजन करण्यात आले होते. या माझी शिक्षण परिषदला शहापूर पंचायत समितीचे गट शिक्षणाधिकारी भाऊसाहेब चौहान यांनी देखील काहीकाळ हजेरी लावली होती. शहापूर केंद्र अंतर्गत १५ शाळांमधील ५० पेक्षा अधिक शिक्षकांनी यावेळी उपस्थित होते. दुपारी १२ नंतर या शिक्षण परिषदेला सुरवात करण्यात आली. त्यावेळी सावरोली शाळेतील मुलांनी देखील विविध वस्तूंचे प्रदर्शन मांडले होते. वरिष्ठ आधिकारीवर्ग या शिक्षण परिषद मधून निघून गेल्यावर येथे उपस्थित शिक्षकांनी लाऊडस्पीकर वर विविध गाणी लावून डान्स करण्यास सुरुवात केली त्यामुळे शिक्षकांचा काही दोष नसल्याचे माजी सरपंच नारायण हरी कैवारी यांनी सांगितले.

क्लिक करा आणि वाचा- विषारी साप गळ्यात लटकवून स्टंटबाजी, फण्याला हात लावणे पडले महागात, घडायला नको तेच घडले

मात्र शिक्षण परिषदेच्या नावाखाली गुरुजी आणि बाईंकडून गाण्यावर ठेका धरल्याचे व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ग्रामस्थांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षणाचे पवित्र प्लॅटफार्म असलेल्या सावरोली बुद्रुक शाळेच्या आवारात, खुद्द शिक्षण परिषद शिक्षकांसाठी ठेवलेली असताना शहापूर केंद्रातील शिक्षकांनी गाण्याच्या तालावर नाचणे हे खेदजनक असल्याचे सावरोली बुर्द्रुक येथील ग्रामस्थांनी सांगितले. आधीच शहापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील जिल्हा परिषद शाळेमधील शैक्षणिक गुणवत्ता तसेच विद्यार्थ्यांची पटसंख्या घसरलेली असतानाच, शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने विद्यार्थ्यी वाढ व शैक्षणिक स्तर वाढवण्यासाठी केंद्रस्तरीय शिक्षण परिषद घेण्यासाठी परिपत्रक काढण्यात आले. विद्यार्थ्यी वाढ व शैक्षणिक स्तर वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे असताना शिक्षकांकडून अशा प्रकारे गाण्याच्या तालावर नाचणे हि खेदजनक बाब असल्याचे ग्रामस्थांकडून बोलले जात आहे.

क्लिक करा आणि वाचा- काँग्रेसला सोयीनुसार वापरण्यापेक्षा…; पक्षांतर्गत संघर्षाने व्यथित थोरातांना विखेंनी डिवचले, केला थेट सवाल

केंद्रात असलेल्या शिक्षकांना शिक्षणाचा स्तर वाढवणे, शाळाबाह्य जी मुले असतील त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणे, शाळेतील मुलांना शाळेत १०० टक्के उपस्थित राहण्यासाठी प्रोत्साहन देणे, या परिषदेच्या माध्यमातून विविध विषयांची आदान – प्रदान जमलेल्या शिक्षकांनी करणे, शिक्षणाच्या नवीन संकल्पना एकमेकांना सांगून त्या दैनंदिन अध्ययन – अध्यापन प्रक्रियेत वापर करणे, गुणवत्ता – मूल्यांकन चे निकष समजून घेऊन त्यानुसार शाळा व मुले यांचा शैक्षणिक दर्जा उंचावने, कुठल्याही बाह्य घटकांवर अवलंबून न राहता केंद्रांअंतर्गत चर्चा करून शैक्षणिक समस्यांवर मार्ग काढणे, केंद्रातील शिक्षकांना वाचन, स्वलेखन, सृजनशीलता, अभिव्यक्ती, कौशल्य यांच्या विकासासाठी प्रेरणा मिळणे, उत्साही, प्रयोगशील शिक्षकांना प्रयोग सादरीकरणाच्या संधीतून प्रयत्न करणे या सारखे अनेक उपक्रम राबवण्यासाठी व मार्गदर्शनासाठी अशा प्रकारचे केंद्र स्तरीय शिक्षण परिषदेचे आयोजन करण्यात येते. मात्र या शिक्षण परिषदेच्या दरम्यान गुरुजी आणि बाईंनी सैराट चित्रपटाच्या झिंगाट या गाण्यावर ठेका धरून नाचतानाचे चित्र पाहायला मिळाले. सध्या शिक्षकांचा हा व्हिडियो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला आहे.

क्लिक करा आणि वाचा- VIDEO : डोकंच चक्रावतं! चक्क उंदराने चोरला महागडा हिऱ्याचा हार, पाहा कशी केली चोरी

ग्रामस्थांनी केली कारवाईची मागणी

या प्रकरणी शहापूर मधील ग्रामस्थांनी यावर कारवाईची मागणी केली आहे. या प्रकरणी शिक्षकांचा दोष नसून केंद्रप्रमुख मनीषा जटाळ, विस्तार अधिकारी प्राजक्ता राऊत तसेच गट विकास अधिकारी आणि शिक्षण अधिकारी यांच्यावर कारवाई झाले पाहिजे असं मागणी ग्रामस्थ आणि सामाजिक कार्यकर्ते सचिन भोईर यांनी केली आहे त्याकरता ते ठाणे जिल्हाधिकारी आणि शिक्षणाधिकारी यांच्याकडे पत्रव्यवहार करणार असल्याचे त्यांनी सांगितले. आता अधिकारी वर्ग या प्रकरणी काय कारवाई करतात? आणि कोणावर कारवाई करतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.