Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

ChatGPT ला टक्कर देण्यासाठी गुगलचे Google Bard उतरले मैदानात, जाणून घ्या

8

नवी दिल्लीः अल्फाबेटची मालकी असलेल्या गुगलने एआय चॅटबॉटला टक्कर देण्याची तयारी केली आहे. कंपनी यासाठी आपल्या एआय चॅटबॉट सर्विसला डेव्हलप करीत आहे. या चॅटबॉटचे नाव आहे Google Bard. सध्या याला यूजर्सच्या फीडबॅकसाठी जारी करण्यात आले आहे. कंपनी आगामी काही आठवड्यात याला जारी करू शकते. अल्फाबेट सीईओ सुंदर पिचाई यांनी स्वतः याला दुजोरा दिला आहे.

लवकरच लाँच होणार गुगलचे एआय चॅटबॉट बार्ड
अल्फाबेट आणि गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांनी सोमवारी एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले की, कंपनी यूजर्सचा फीडबॅक घेण्यासाठी बार्ड नावाचे एक कन्वर्सेशनल एआय सर्विस सुरू करीत आहे. टेस्टिंगनंतर आगामी काही आठवड्यात याला रिलीज केले जाईल.

ब्लॉग पोस्टनुसार, एक्सपेरिमेंटल कन्वर्सेशनल एआय सर्विस बार्डला LaMDA (लँग्वेज मॉडल आणि डायलॉग एप्लिकेशन) द्वारे तयार केले जाईल. लाम्बडा गुगलचे एक एआय चॅटबॉट आहे. जे व्यक्तीप्रमाणे विचार करते. कंपनी याला दोन वर्षापूर्वी आणले होते. पिचाई यांनी म्हटले की, कंपनीचे नवीन एआय चॅटबॉट बार्डची क्षमता संबंधी याला कंपनीच्या मोठ्या लँग्वेज मॉडलची पॉवर, बुद्धीमता आणि संयोजन सोबत आणले जावू शकते.

गुगलच्या सीईओ यांनी सांगितले की, यूजर्सच्या फीडबॅक आणि वेब वर उपलब्ध माहितीनुसार, ज्ञान मिळेल. कंपनी सुरुवातीला LaMDA च्या हलक्या मॉडल व्हर्जन सोबत टेस्टरसाठी एआय सिस्टमला रोलआउट करेल. भविष्यात याच्या एआय सिस्टमला आणखी जबरदस्त बनवण्यासाठी काम केले जाईल.

ChatGPT ला देणार टक्कर

कंपनीचे नवीन एआय चॅटबॉट बार्डला OpenAI च्या ChatGPT ला टक्कर देण्यासाठी आणले जाणार आहे. चॅटजीपीटी टिक टॉक आणि इंस्टाग्राम सारख्या प्लॅटफॉर्मला मागे टाकत सर्वात जास्त वेगाने वाढणारे यूजर अॅप्लिकेशन बनले आहे. चॅटजीपीटीने लाँच केलेल्या दोन महिन्यात याला १०० मिलियन महिन्याला अॅक्टिव यूजर्स बनले आहेत.

वाचाः Valentine’s Day 2023 : स्वस्तात मिळताहेत शाओमी, रेडमी, ओप्पो आणि सॅमसंगचे स्मार्टफोन्स, पाहा ऑफर्स

गुगलकडून Anthropic मध्ये मोठी गुंतवणूक
गुगलकडून नुकतीच Anthropic मध्ये ४०० मिलियन डॉलर म्हणजेच जवळपास ३ हजार २९९ कोटी रुपयाची गुंतवणूक केली आहे. या गुंतवणुकीची रिपोर्ट वर गुगल आणि Anthropic पैकी कोणावरही टिप्पणी केली नाही. परंतु, दोन्ही पार्टनरशीप आवश्यक आहे. या पार्टनरशीप अंतर्गत चॅटजीपीटी सारखे एआय टूल तयार केले जाईल. अनेक रिपोर्ट मध्ये दावा केला जात आहे की, गुगल आज Anthropic मध्ये गुंतवणूक करीत असला तरी भविष्यात गुगल या कंपनीचे अधिग्रहन करू शकते. जानेवारी २०२१ मध्ये Anthropic एआय ओपन एआय खूप लोकप्रिय चॅटजीपीटी प्रतिस्पर्धी क्लाउड नावाचे एक नवीन चॅटबॉटला टेस्ट केले जावू शकते.

वाचाः Jio आणि Airtel च्या टक्करमध्ये Vi चा बेस्ट प्लान, कमी किंमतीत महिनाभर डेटा आणि अनलिमिटेड कॉलिंग

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.