Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Sachin Ingle Vs Abhijit Bichukale | कसबा विधानसभा मतदारसंघात सध्या दररोज नव्या राजकीय घडामोडी पाहायला मिळत आहेत. कायम चर्चेत असणारे अभिजित बिचुकले यांच्याबाबत घडलेला कसब्यातील एका प्रसंगाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
हायलाइट्स:
- बिचुकले निवडणूक आयोगाच्या कार्यालयात आले होते
- त्याठिकाणी लहुजी छावा संघटनेचे अध्यक्ष सचिन इंगळे उपस्थित होते
- सचिन इंगळे आणि अभिजित बिचुकले यांच्यात शाब्दिक बाचाबाची
कसब्याची पोटनिवडणूक गेल्या काही दिवसांपासून चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपने टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी न दिल्याच्या मुद्द्यावरुन कसब्यातील ब्राह्मण समाज नाराज झाला होता. या नाराजीची दखल घेत भाजपने उमेदवारीबाबत पुनर्विचार करायची तयारी दर्शविली होती. महाविकास आघाडीने रवींद्र धंगेकर यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतल्यास आम्ही टिळक घराण्यातील व्यक्तीला उमेदवारी देऊ. आमचा फॉर्म आणि इतर कागदपत्रे तयार आहेत, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले होते.
भाजपचे हेमंत रासने आणि काँग्रेसच्या रवींद्र धंगेकर यांच्यातील लढतीमुळे कसबा पोटनिवडणूक रंगतदार ठरण्याची शक्यता आहे. या पोटनिवडणुकीच्या रिंगणात अभिजित बिचुकले यांनीदेखील उडी घेतली होती. दोन दिवसांपूर्वीच अभिजित बिचुकले यांच्या पत्नी अलंकृता बिचुकले यांनी कसबा पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज विकत घेतला होता. त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत की नाही, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु, अलंकृता बिचुकले यांनी कसब्याची पोटनिवडणूक लढायची ठरवल्यास त्यांच्या प्रचारासाठी अभिजित बिचुकले सक्रिय होण्याची शक्यता आहे.
अभिजित बिचुकले यांनी यापूर्वी आमदारकी, खासदारकीपासून ते अगदी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवली आहे. २०१९ साली त्यांनी वरळी विधानसभा मतदारसंघातून आदित्य ठाकरे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. मात्र, आजपर्यंत त्यांना एकाही निवडणुकीत यश मिळाले नव्हते. याशिवाय, टेलिव्हिजनवरील बिग बॉस या कार्यक्रमातही अभिजित बिचुकले सहभागी झाले होते. त्यामुळे बिचुकले यांना अमाप प्रसिद्धी मिळाली होती.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.