Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
Aaditya Thackeray worli vidhan sabha constituency | आदित्य ठाकरे यांनी ठाण्यात जाऊन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविरोधात विधानसभा निवडणूक लढवण्याची भाषा केली होती. मात्र, आता शिंदे गटाकडून वरळीतील ठाकरे गटाचे दोन बिनीचे शिलेदार फोडले जाऊ शकतात.
हायलाइट्स:
- आदित्य ठाकरेंचा वरळीचा बालेकिल्ला ढासळणार?
- आदित्य ठाकरेंना विजय मिळवून देणारे दोन बिनीचे शिलेदार फुटणार?
- शिंदे गटाच्या संजय शिरसाट यांचा दावा
आदित्य ठाकरे यांना सगळे कंटाळले आहेत. सुनील शिंदेच काय सचिन अहिर हेदेखील शिंदे गटात येऊ शकतात. वरळी विधानसभा मतदारसंघात सचिन अहिर आणि सुनील शिंदे यांची स्वत:ची अशी ताकद आहे. या दोघांच्या जीवावरच आदित्य ठाकरे वरळीमध्ये निवडून आले. त्यामुळे उद्या सचिन अहिर यांनीदेखील शिंदे गटात यायला हरकत नाही. ते शिंदे गटात आले तर त्यांचे स्वागतच होईल, असे संजय शिरसाट यांनी म्हटले. संजय शिरसाट यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
एवढं नक्की, सबको हिला दिया; आदित्य ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं
आदित्य ठाकरे यांच्यापूर्वी वरळी विधानसभा मतदारसंघात सुनील शिंदे यांनी विजय मिळवला होता. तर याच परिसरात सचिन अहिर यांना मानणाराही एक मोठा वर्ग आहे. २०१९ मध्ये उद्धव ठाकरे आणि शिवसेनेच्या धुरिणांनी व्यवस्थित चाचपणी करुन आदित्य ठाकरे यांना वरळी विधानसभा मतदारसंघाच्या रिंगणात उतरवले होते. त्यासाठी तत्कालीन विद्यमान आमदार सुनील शिंदे यांची समजूत काढण्यात आली होती. तर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेल्या सचिन अहिर यांना शिवसेनेत आणून वरळी विधानसभा मतदारसंघ आदित्य ठाकरे यांच्यासाठी पूर्णपणे सुरक्षित करण्यात आला होता. मात्र, आता वरळीतील हेच दोन प्रभावशाली नेते शिंदे गटात गेल्यास ठाण्यातून मुख्यमंत्र्यांविरोधात निवडणूक लढण्याचे आव्हान देणाऱ्या आदित्य ठाकरे यांचे मनसुबे धुळीला मिळू शकतात. त्यामुळे आगामी काळात वरळीत शिंदे गट राजकीय स्फोट करणार का, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
एका पाठोपाठ एक चॅलेंज, गोडसेंच्या होमपीचवर आदित्य ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना पुन्हा डिवचलं!
आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले?
आदित्य ठाकरे हे सध्या नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आमदारकीचा राजीनामा देऊन आपल्याविरोधात वरळीतून निवडणूक लढण्याचे आव्हान दिले होते. या वक्तव्याला काही दिवस उलटल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आणखी पुढे जात एकनाथ शिंदे यांच्याविरोधात ठाण्यातून निवडणूक लढवण्याची भाषा केली होती. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे माझ्या चॅलेंजला घाबरले. मी दुसरं चॅलेंज देतो, तुम्ही मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्या, मी राजीनामा देतो. मी ठाण्यात येतो. तिथे लढून दाखवतो, बघू कोण जिंकून येतंय, एकदा होऊनच जाऊ द्या, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले होते.
जवळच्या शहरातील बातम्या
Marathi News App: तुम्हालाही तुमच्या अवतीभवती होत असलेल्या बदलांमध्ये सहभागी व्हायचं आहे? सिटिझन रिपोर्टर अॅप डाउनलोड करा आणि रिपोर्ट्स पाठवा.