Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Galaxy S23 सीरीज लाँच होताच Samsung ने ६० हजार स्वस्त केला Galaxy S22 Ultra

22

नवी दिल्लीः Samsung Galaxy S23 सीरीज लाँच झाली आहे. जर तुम्हाला नवीन फोन खरेदी करायचा असेल तर आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी एका खास डील संबंधी माहिती देत आहोत. या सीरीजच्या लाँचिंग नंतर Samsung Galaxy S22 च्या किंमतीत मोठी घसरण पाहायला मिळत आहे. जर तुम्ही या फोनला खरेदी करायचा विचार करीत असाल तर तुमच्यासाठी एक खास ऑप्शन आहे. याच्या मदतीने तुम्ही ६० हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळवू शकता. जाणून घ्या डिटेल्स.

Samsung Galaxy S22 Ultra ला जर तुम्ही सॅमसंगच्या अधिकृत साइटवरून खरेदी करीत असाल तर तुम्हाला ६० हजार रुपये सूट मिळू शकते. सॅमसंगने आपल्या वेबसाइटवर लिहिले आहे की, जुनाी स्मार्टफोन कंपनीला परत केल्यास ५१ हजार रुपयांपर्यंत एक्सचेंज ऑफर अंतर्गत सूट मिळू शकते. परंतु, पहिली अट म्हणजे तुमच्या फोनची कंडिशन चांगली असायला हवी. तसेच स्मार्टफोनचे कोणते मॉडल आहे, हेही महत्त्वाचे आहे.

वाचाः येतोय कमी किंमतीचा स्वस्त Realme 10T 5G फोन

Samsung Galaxy S22 Ultra (256GB+12GB) ला १ लाख ९ हजार ९९९ रुपये किंमतीत आणले होते. तर Samsung Galaxy S22 Ultra (512GB+12GB) ऑप्शनमध्ये १ लाख १८ हजार ९९९ रुपये किमतीत येतो. तर Exchange Benefits मध्ये तुम्हाला सर्वात जास्त फायदा मिळतो. ही ऑफर पुढील डिव्हाइस ऑर्डर केल्यानंतर मिळते. सोबत यात Samsung Club Loyalty Program अंतर्गत ऑफर सुद्धा मिळते.

वाचाः Jio ने आणला धमाकेदार ब्रॉडबँड प्लान, ३९९ रुपयात मिळेल अनलिमिटेड डेटा

फोनमध्ये Galaxy चा पहिला 4nm Processor दिला आहे. कंपनी दावा करते की, अजूनपर्यंत हा सर्वात पॉवरफुल आणि फास्ट चिप आहे. यात 45W सुपरफास्ट चार्जिंग ऑफर सुद्धा दिली जात आहे. फोनमध्ये Dynamic AMOLED 2X Diplay दिले आहे. जी 1750 Nits Brightness सोबत येते. याचा फायदा म्हणजे ब्राइट सनलाइट मध्ये सुद्धा व्ह्यूएबल असते. Nightography साठी हे सर्वात खास आहे. म्हणजेच तुमची फोटोग्राफी खास होते.

वाचाः स्मार्टफोन वापरताना या चुका कधीच करू नका, फोनचे होणारे नुकसान जाणून घ्या

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.