Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
टी. महेश फिल्म्सच्या टी. महेश आणि अनिल बबनराव वणवे यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तसंच उमेशचंद्र शिंदे आणि नयन चित्ते सहनिर्माते आहेत. चित्रपटाचं दिग्दर्शन टी. महेश यांनी केलं आहे. जमीर अत्तार यांनी कथा आणि गीतलेखन, महेशकुमार मुंजाळे, जमीर अत्तार आणि निलेश महिगावकर यांनी पटकथा लेखन, संवादलेखन निलेश महिगावकर, योगेश एम. कोळी यांनी छायांकन केलं असून रोहन पाटील यांनी संकलन केले आहे.
बांधकाम मजुराचा मुलगा शेजारी राहणाऱ्या मुलासाठी आणलेला घोडा पाहून तसाच घोडा आणण्याची मागणी करतो. पण आर्थिक परिस्थिती बिकट असलेले त्याचे वडील आपल्या मुलाची इच्छा पूर्ण करू शकतात का ? परिवाराच्या सुखासाठी झटणाऱ्या बापाची अनोखी कहाणी घोडा याचित्रपटातून रुपेरी पडद्यावर झळकणार आहे. मराठी चित्रपटसृष्टीत आतापर्यंत अनेक बाप आणि मुलाच्या नातेसंबंधावर आधारित चित्रपट झाले असले तरी हा चित्रपट नक्कीच वेगळा आहे. कष्टकरी आणि भांडवलदारी वर्ग यांच्या लढ्यात फुलणारं एक गोड स्वप्न म्हणजे हा चित्रपट आहे.
पाहा ट्रेलर:
हृदयस्पर्शी कथानक, कसदार लेखन, उत्तम कलाकार असलेला हा चित्रपट तांत्रिकदृष्ट्याही तितकाच दमदार आहे. ट्रेलर पाहिल्यानंतर प्रेक्षकांमध्ये चित्रपटाबद्दल उत्सुकता वाढली आहे. काही तासांतच ट्रेलरला हजारो लाइक्स मिळाले आहेत.