Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

आयुष्यात मोठं वादळ आलं आणि गझल सम्राट जगजीत सिंह यांनी घेतला होता मोठा निर्णय

5

मुंबई: ‘झुकी झुकी सी नजर’, ‘वो कागज की कश्ती’, ‘देश में निकला होगा चांद’ अशा एकाहून एक सुरेख गझला जगजीत सिंह यांनी त्यांच्या धीरगंभीर आवाजात अजरामर केल्या आहेत. त्यांच्या जयंतीनिमित्तानं जाणून घ्या त्यांच्याबद्दल माहित नसेलल्या गोष्टी.

सरकारी अधिकारी व्हायचं होतं….
जगजीत सिंह यांच्या आवाजात गझल ऐकणं म्हणजे जणू स्वर्गीय आनंदच. जगजीत सिंह यांचं बालपणीचं नाव जगमोहन सिंह होतं. त्यांचा जन्म राजस्थानातल्या श्रीगंगानगरमध्ये झाला. आपल्या वडिलांप्रमाणंच जगजीत सिंह यांनाही सरकारी अधिकारी व्हायचं होतं. पण त्यांची संगीताची आवड पाहून त्यांच्या वडिलांनी त्यांना गायनाचे धडे देण्याचं ठरवलं. जगजीत सिंह आधी पंडित छगनलाल शर्मा आणि नंतर उस्ताद जमाल खान यांच्याकडून संगीत शिकले.

मुंबईला पळू आले आणि…

जगजीत सिंह यांनी आपल्या करिअरची सुरूवात आकाशवाणी जालंधरसाठी गाणं तयार करून केली. नंतर घरी कोणाला न सांगता ते मुंबईला पळून आले. त्यांनी मुंबईत खूप संघर्ष केला. हळूहळू त्यांना जाहिरातींचे जिंगल्स आणि पार्श्वगायनाची संधी मिळाली.जगजीत सिंह आणि चित्रा सिंह यांची भेट १९६७ मध्ये झाली. दोघांनी एकत्र खूप गाणी गायली. एकमेकांच्या प्रेमात पडल्यानंतर दोघांनी १९६९ मध्ये लग्न केलं. चित्राचं हे दुसरं लग्न होतं.

१९९० मध्ये जगजीत सिंह आणि चित्रा सिंह यांच्या आयुष्यात एक वादळ आलं. त्यांच्या मुलाचा विवेकचा एका कार अपघातात मृत्यू झाला. या धक्क्यातून न सावरलेल्या जगजीत सिंह यांनी दीर्घ काळ गायनापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला. ते जेव्हा पुन्हा गाऊ लागले, तेव्हा त्यांनी एकाहून एक सुरस गझला गायल्या. जगजीत सिंह यांचे तब्बल ८० अल्बम संगीत जगतात विक्रम नोंदवणारे ठरले होते. संगीत अल्बम ही संकल्पनाच जगजीत सिंग आणि चित्रा सिंग या दाम्पत्यानं भारतात पहिल्यांदा रुजवली होती.

‘द अनफरगेटेबल’, ‘सहर’, ‘संवेदना’, ‘क्लोज टू माय हार्ट’ हे जगजीत सिंह यांचे काही लोकप्रिय अल्बम आहेत. ऑक्टोबर २०११ मध्ये जगजीत सिंह यांचा ब्रेन हॅमरेजने मृत्यू झाला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.