Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सिमी करणचे शालेय शिक्षण भिलाई येथे झाले आहे. तिचे वडील भिलाई स्टील प्लांटमध्ये काम करत होते आणि आई शिक्षिका होती. सिमी करण लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. बारावीनंतर तिने आयआयटी बॉम्बेमध्ये इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला. तिथे शिकत असताना तिला झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना शिकवण्याची संधी मिळाली.
झोपडपट्टीत राहणारी मुलं पाहिल्यानंतर, आपलं आयुष्य लोकांच्या सेवेत घालवायचं हे तिने मनाशी पक्कं केलं. त्यामुळे इंजिनीअर होण्याऐवजी तिने यूपीएससी परीक्षेची तयारी सुरू केली. सिमी करणने अभ्यासक्रमाची काही भागांमध्ये विभागणी करून मर्यादित अभ्यासक्रम सामग्रीसह तिची तयारी सुरू केली.
आयआयटीची परीक्षा दिल्यानंतर सिमी करणने काही महिन्यातच यूपीएससी तयारी करुन परीक्षा दिली. सिमी करण यूपीएससी सीएसई २०१९ परीक्षेत ३१ वा क्रमांक मिळवून आयएएस अधिकारी बनली. ती आसाम-मेघालय कॅडरशी संबंधित आहे. यूपीएससी प्रशिक्षणादरम्यान तिला सर्वोत्कृष्ट प्रशिक्षणार्थी अधिकारी म्हणून गौरविण्यात आले. सिमी करण सध्या दिल्लीत सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत.