Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Nothing Phone (2) साठी राहा तयार, स्टाईल आणि प्रीमियम क्वॉलिटी मिळणार

16

नवी दिल्लीः नथिंग कंपनीने आपला पहिला स्मार्टफोन Nothing Phone (1) ला गेल्या वर्षी लाँच केले होते. एका वेगळ्या डिझाइन मुळे या फोनला जबरदस्त प्रतिसाद मिळाला होता. आता २०२३ मध्ये हाच ब्रँड दुसरा स्मार्टफोन Nothing Phone (2) घेवून येणार आहे. Nothing Phone (2) संबंधी नवीन रिपोर्ट समोर आले आहे. हा मोबाइल फोन २०२३ च्या तिसऱ्या तिमाहीत लाँच केला जावू शकतो. या फोनचे मॉडल नंबर A065 सांगितले गेले आहे. रिपोर्टनुसार, ऑगस्ट महिन्यात जवळपास हा नथिंग फोन मार्केटमध्ये एन्ट्री करू शकतो. हा स्मार्टफोन सर्वात आधी अमेरिकेत लाँच केला जावू शकतो. त्यानंतर भारतीय बाजारात याला आणले जावू शकते. नथिंग फोन २ एक फ्लॅगशीप फोन असणार आहे.

नथिंग फोन २ साठी कंपनीचे सीईओ कार्ल पेई यांनी आधीच सांगितले आहे की, हा प्रीमियम डिव्हाइस असेल. तसेच फोन १ च्या तुलनेत जास्त अडवॉन्स्ड असेल. माय स्मार्ट प्राइसच्या रिपोर्टनुसार, हा स्मार्टफोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ८ सीरीजच्या चिपसेट वर लाँच केला जाईल. Nothing Phone (2) मध्ये Snapdragon 8 Gen 2 पाहायला मिळू शकते. Nothing Phone (2) ला १२ जीबी रॅम मेमरी सोबत मार्केटमध्ये आणले जावू शकते. हा फोन व्हर्च्युअल रॅम टेक्नोलॉजी सुद्धा देवू शकतो. रिपोर्टनुसार, हा स्मार्टफोन २५६ जीबी इंटरनल स्टोरेज सपोर्ट करेल. फोनमध्ये अमोलेड डिस्प्ले दिला जाईल. स्क्रीन साइजवरून अद्याप पडदा हटवला गेला नाही. रिपोर्टनुसार, हा डिस्प्ले १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट वर काम करू शकतो. या फोनमध्ये ५००० एमएएच क्षमतेची बॅटरी दिली जावू शकते.

वाचाः OnePlus 11 5G : वनप्लस 11 5G ची भारतात जोरदार एन्ट्री, पाहा किंमत-फीचर्स

Nothing Phone (1)
Nothing Phone (1) या फोनला भारतात तीन मेमरी व्हेरियंट्स सोबत उपलब्ध करण्यात आले आहे. सर्वात छोटा ब्लॅक कलरचा ८ जीबी रॅम प्लस १२८ जीबी स्टोरेज व्हेरियंटला २९ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते. ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या व्हाइट कलर मॉडलला ३२ हजार ४९९ रुपये किंमतीत खरेदी करू शकता. तर सर्वात मोठे १२ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनला ३५ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते. या फोनमध्ये Qualcomm Snapdragon 8 Plus Gen 1 दिले आहे. फोनमध्ये ६.६७ इंचाचा डिस्प्ले, ५० मेगापिक्सलचे तीन रियर कॅमेरे तसेच ३२ मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. फोनला पॉवर देण्यासाठी 4700 mAh ची बॅटरी दिली आहे.

वाचाः OnePlus Buds Pro 2 भारतात लाँच, प्री-ऑर्डर सुरू, १४ फेब्रुवारीपासून विक्री

वाचाः OnePlus Pad : वनप्लसने लाँच केला 9510mAh बॅटरीचा पहिला टॅबलेट

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.