Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OnePlus TV लाँच होताच मोठा धमाका, कंपनीकडून या टीव्हीच्या किंमतीत १२ हजाराची कपात

7

नवी दिल्लीः OnePlus ने कालच्या आपल्या मोठ्या इव्हेंट मध्ये OnePlus Q2 Pro 65 inch Smart QLED TV प्रीमियम टीव्ही लाँच केला आहे. या टीव्हीची किंमत ९९ हजार ९९९ रुपये आहे. प्रत्येकाला इतका महाग टीव्ही खरेदी करणे शक्य नाही. त्यामुळे कंपनीने आपल्या एका जुन्या ४३ इंच स्मार्ट टीव्हीवर बंपर ऑफर देण्यास सुरुवात केली आहे. OnePlus Y सीरीजच्या टीव्हीला तुम्ही १२ हजार रुपये फ्लॅट डिस्काउंट सोबत खरेदी करू शकता. तसेच अन्य ऑफर्स सुद्धा दिले आहेत.

OnePlus 108 cm (43 inches) Y Series 4K Ultra HD Smart Android LED TV टीव्हीची किंमत आणि ऑफर्स
हा टीव्ही एक 4K अल्ट्रा एचडी स्मार्ट अँड्रॉइड एलईडी टीव्ही आहे. हा ४३ इंचाच्या मोठ्या स्क्रीन सोबत येतो. या टीव्हीला अमेझॉनवर ३९ हजार ९९९ रुपये किंमतीत लिस्ट करण्यात आले आहे. परंतु, याला १२ हजार रुपयाच्या फ्लॅट डिस्काउंट सोबत २७ हजार ९९९ रुपये किंमतीत खरेदी करता येवू शकते. तसेच या टीव्हीला तुम्ही ईएमआय वर सुद्धा खरेदी करू शकता. दर महिना १३३८ रुपये देवून खरेदी करू शकता. यासोबत जुन्या टीव्हीला २२०० रुपयात एक्सचेंज करू शकता. जुन्या टीव्हीला एक्सचेंज करताना तुम्हाला जर पूर्ण रक्कम मिळाली तर हा टीव्ही तुम्हाला आणखी कमी किंमतीत खरेदी करता येवू शकतो. याची किंमत २५ हजार ७९९ रुपये राहते.

वाचाः OnePlus Buds Pro 2 भारतात लाँच, प्री-ऑर्डर सुरू, १४ फेब्रुवारीपासून विक्री

टीव्हीचे खास फीचर्स
४३ इंचाच्या या टीव्हीत 4K Ultra HD (3840×2160) डिस्प्ले दिला आहे. याचा रिफ्रेश रेट 60 हर्ट्ज दिला आहे. सोबत यात 3 HDMI पोर्ट्स दिले आहेत. सोबत 2 USB पोर्ट्स आहेत. यात 24W चे साउंड आउटपूट दिले आहे. हा टीव्ही Netflix, Youtube, Prime Video, Hotstar, SonyLiv, Hungama, JioCinema, Zee5, Eros Now, Oxygen Play सपोर्टेड अॅप्स सोबत येतो. याची डिझाइन बेजल – लेस आहे.

वाचाः Nothing Phone (2) साठी राहा तयार, स्टाईल आणि प्रीमियम क्वॉलिटी मिळणार

वाचाः OnePlus 11 5G : वनप्लस 11 5G ची भारतात जोरदार एन्ट्री, पाहा किंमत-फीचर्स

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.