Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

OnePlus आणणार आपला पहिला 5G Router, Jio Air Fiber ला देणार टक्कर

11

नवी दिल्लीः OnePlus Cloud 11 इव्हेंट मध्ये कंपनीने एक सरप्राइज दिले आहे. कंपनी जुलै २०२३ मध्ये आपले एक 5G राउटर लाँच करणार आहे. OnePlus Hub 5G Router वरून इव्हेंट दरम्यान अनेक गोष्टी सांगितल्या गेल्या आहेत. हे कंपनीचे पहिले राउटर प्रोडक्ट आहे. कंपनी स्मार्टफोन्स शिवाय, बाकीच्या सेक्टर्स मध्ये सुद्धा आपले हात पाय पसरवत आहे. जाणून घ्या या संबंधीची सविस्तर माहिती.

OnePlus Hub 5G Router चे फीचर्स
या राउटरच्या मुख्य फीचर्स मध्ये WiFi 6 कनेक्टिविटी दिली आहे. सोबत यात 5G/4G सिम कार्ड सपोर्ट दिले आहे. हे एक होम हब आहे. जे मॅटर प्रोटोकॉल सपोर्ट सोबत येते. २ पेक्षा जास्त कनेक्ट केल्यानंतर हे होम मॅश नेटवर्क बनतो. यात 5G, 4G और WiFi नेटवर्क अॅक्टिविटीसाठी LED इंडीकेटर्स सुद्धा दिले आहेत.

वाचाः OnePlus 11 5G : वनप्लस 11 5G ची भारतात जोरदार एन्ट्री, पाहा किंमत-फीचर्स

OnePlus Hub 5G Router ला कधी लाँच करणार
सध्या या डिव्हाइसची अॅक्यूरेट लाँच डेट सांगितली नाही. परंतु, हे जरूर म्हटले की, याला जुलै २०२३ मध्ये मार्केटमध्ये उतरवले जावू शकते. या प्रोडक्टची टक्कर Jio Air Fiber राउटरशी होईल. परंतु, जिओचे राउटर सुद्धा अजून पर्यंत बाजारात उपलब्ध करण्यात आले नाही.

वाचाः Nothing Phone (2) साठी राहा तयार, स्टाईल आणि प्रीमियम क्वॉलिटी मिळणार

भारतात 5G राउटर किंवा CPE मार्केटच्या वाढण्याची शक्यता आहे. कारण, ५जी रोलआउट झाली आहे. वर्ष २०२३ आणि २०२४ पर्यंत ही सर्विस अनेक शहरात पोहोचवली जाईल. एअरटेल आणि जिओ दोन्ही कंपन्या संपूर्ण भारतात ५जी सर्विस उपलब्ध करीत आहेत. भारतीय मार्केटमध्ये असे कोणतेही राउटर नाही. जे जिओ किंवा एअरटेल वर ५जी नेटवर्क सपोर्ट करते.

वाचाः OnePlus TV लाँच होताच मोठा धमाका, कंपनीकडून या टीव्हीच्या किंमतीत १२ हजाराची कपात

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.