Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
शिवानी लवकरच झी मराठीवरून प्रसारित होणाऱ्या तुला शिकवीन चांगलाच धडा या नव्यानं प्रसारित होणाऱ्या मालिकेत दिसणार आहे. अलिकडेच या मालिकेचा प्रोमो प्रसारित झाला आहे. त्या प्रोमोनुसार मालिकेत शिवानी ही अक्षरा ही भूमिका साकारणार आहे. लग्नानंतर शिवानीची ही पहिलीच मालिका असल्यानं तिच्यासाठी ही खास आहे.
मालिकेच्या निमित्तानं शिवानीनं एका खास मुलाखत दिली. त्या मुलाखतीत शिवानीला तिच्या वैवाहिक आयुष्याबद्दल आणि सासूबाईंबद्दल प्रश्न विचारण्यात आले. शिवानीनं सांगितलं की, ‘विराजसची आई म्हणजे मृणाल कुलकर्णी यांना पहिल्यापासूनच त्यांची होणारी सून कोण आहे? हे माहिती होते. मी आणि विराजस कॉलेजपासूनच चांगले मित्र आहोत. आम्ही अनेक नाटकांत एकत्र काम केलं आहे. आम्ही सतत एकमेकांबरोबर राहत असल्यानं आम्ही कपलच आहोत असं अनेकांना वाटू लागलं आणि ते त्याचदृष्टीनं आमच्याकडे पाहू लागले. आधी मित्र-मैत्रिणी त्यानंतर घरातल्यांनही असा समज करून घेतल्यानं पुढं आम्ही देखील आमच्या नात्याचा गंभीरपणं विचार केला.’
मी त्यांना सासूबाई म्हणत नाही तर…
शिवानीनं पुढं सांगितलं की, ‘विराजस कायम मला घेऊन घरी जायचा. मी आणि मृणाल कुलकर्णी यांनीही अनेक प्रोजेक्टसमध्ये एकत्र काम केलं आहे. मृणाल कुलकर्णी यांना सर्वचजण संतूर मॉम असं म्हणायचे. मी मात्र त्यांना सेटवर ताई म्हणून हाक मारायचे. आजही लग्न झाल्यानंतर मी त्यांना ताई याच नावानं हाक मारते.’ शिवानीनं पुढं सांगितलं की, ‘ताईकडे पाहिल्यावर मला त्यांना कधीच काकू, मावशी या नावानं हाक माराविशी कधीच वाटली नाही.’ असंही शिवानीनं यावेळी सांगितलं.
‘विराजसशी लग्न झाल्यानंतर मी त्यांना काय हाक मारू, असा प्रश्न मला पडला होता. त्यावेळी अनेकदा मी गप्प बसायचे. त्यावेळी त्यांनीच मला तू ताई म्हणूनच हाक मार. मला त्यात काहीच वावगं वाटणार नाही, असं सांगितलं. त्यामुळेच मी आजही मृणाल कुलकर्णी यांना ताई म्हणूनच हाक मारते. हे ऐकल्यावर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसतो,’ असे शिवानीनं सांगितलं.
दरम्यान, विराजस आणि शिवानी यांचा विवाहसोहळा अगदी पारंपारिक पद्धतीनं पार पडला. त्यावेळी त्यांचे नातेवाईक आणि मित्रमंडळी आवर्जून सोहळ्याला उपस्थित होती.