Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
दुसऱ्या आठवड्यात पठाणची कमाई दुहेरी अंकावरून एकेरी अंकावर आली आहे. पठाणच्या १४ व्या दिवसाच्या कमाईचे आकडे समोर आले आहेत. प्रदर्शनाच्या १४ व्या दिवशी पठाणचे ऑल इंडिया नेट कलेक्शन ७ ते ८ कोटी रुपये आहे. यापूर्वी १३ व्या दिवशी पठाणने सुमारे ९.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता. सोमवार आणि मंगळवारच्या कमाईत फारसा फरक नव्हता. याचाच अर्थ पठाणच्या कमाईत घसरण झाली असली, तरीही बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट अजूनही टेक धरून आहे. पठाण लवकरच भारतीय बॉक्स ऑफिसवर ५०० कोटींचा आकडा गाठू शकतो असं म्हटलं जात आहे.
जगभरातील बॉक्स ऑफिसवर पठाणचा डंका
पठाणची जादू केवळ देशातच नाही तर जगभर पसरली आहे. शाहरुखच्या सिनेमाबाबत चाहत्यांची क्रेझ प्रदर्शनाच्या दुसऱ्या आठवड्यातही पाहायला मिळत आहे. किंग खानचा चित्रपट जगभरातील बॉक्स ऑफिसवर १ हजार कोटींचा आकडा गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे.
शाहरुख खान जवळपास चार वर्ष मोठ्या पडद्यापासून दूर असला तरी त्याने धमाकेदार वापसी केली आहे. पठाणमुळे अनेक सिंगल थिएटर हाऊसफुल झाले आहेत. पठाणने बॉक्स ऑफिसवर शानदार ओपनिंग करून इतिहास रचला आहे आणि आजही नवनवीन रेकॉर्ड मोडत आहे. दरम्यान, सिनेमात शाहरुखसोबत दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. अनेक वर्षांनी जॉन नकारात्मक भूमिकेत दिसत आहे.