Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

बॉलिवूडचा शापित राजकुमार! ‘आशिकी’नंतर पदरी पडले ६० चित्रपट पण नशिबाने दगा दिला आणि …

7

मुंबई- बॉलिवूडमध्ये कधी कुणाचं नशीब फळफळेल सांगता येत नाही. कोणता चित्रपट हिट होईल आणि कोणता फ्लॉप याबद्दल अंदाज बांधणं खरंच कठीण आहे. बॉलिवूड एका क्षणात एखाद्या व्यक्तीला यशाच्या शिखरावर पोहोचवतं तर दुसऱ्याचं क्षणाला त्याला धाडकन जमिनीवर आपटतं. असंच काहीसं घडलं अभिनेता राहुल रॉयसोबत. दिसायला देखणा, साधीशी शरीरयष्टी पण करारी नजर असणारा राहुल एकाएकी बॉलिवूडच्या टॉपच्या अभिनेत्यांच्या यादीत जाऊन बसला. मात्र त्यानंतर त्याचं नशीब असं पालटलं की त्याने बॉलिवूडमधून काढता पाय घेतला. ‘आशिकी’ फेम राहुलसोबत असं काय झालं होतं ज्यामुळे त्याने बॉलिवूड सोडण्याचा निर्णय घेतला. प्रचंड यश अनुभवल्यानंतर त्याला तब्बल ६० चित्रपटांसाठी विचारणा झाली. त्याने ते चित्रपट साइनही केले मात्र ते पूर्ण करण्यापूर्वीच त्याने बॉलीवूडला रामराम ठोकला. ९ फेब्रुवारी रोजी राहुल त्याचा ५५ वा वाढदिवस साजरा करत आहे.त्याच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया अभिनेत्याच्या आयुष्यातील ते किस्से.

असा मिळालेला पहिला चित्रपट

राहुल सुरुवातीला मॉडेलिंग करत होते. त्यांची आई इंदिरा रॉय फॅशन मॅगझीनमध्ये कॉलम लिहायची आणि वडील दीपक रॉय हे एक बिजनेसमन होते. १९८० सालची गोष्ट आहे. एके दिवशी इंदिरा यांनी लिहिलेलं एक आर्टिकल दिग्दर्शक महेश भट्ट यांनी वाचलं आणि त्यांनी त्यांना भेटायची इच्छा व्यक्त केली. या मीटिंगमध्ये गप्पा मारताना इंदिरा यांनी त्यांच्या मुलाबद्दल म्हणजे राहुलबद्दल महेश यांना सांगितलं. त्यांनी राहुलचे काही फोटोही त्यांना दाखवले.

महेश भट्ट झाले खुश

महेश भट्ट झाले खुश

ते फोटो पाहून महेश खुश झाले आणि त्याला आपल्या चित्रपटात घेण्याचा निर्णय घेतला. हा राहुलचा पहिला चित्रपट होता ज्याने बॉक्स ऑफिसवरचे सगळे रेकॉर्ड तोडले. राहुलचा ‘आशिकी’ हा चित्रपट तब्बल ६ महिने हाउसफुल सुरू होता. दररोज चित्रपट पाहायला गर्दी होत होती. तेव्हा त्यांची गणना टॉपच्या अभिनेत्यांमध्ये होऊ लागली. त्यानंतर एक वेळ अशी आली जेव्हा त्यांच्याकडे तब्बल ६० चित्रपटांच्या ऑफर आल्या. त्या सगळ्या त्यांनी स्वीकारल्या.

‘आशिकी’ची जादू संपली

आशिकीची जादू संपली

सगळ्या चित्रपटांना वेळ देण्याच्या नादात ते एका दिवसात तीन- तीन चित्रपटांचं चित्रीकरण करत. मात्र पुढे त्यांना ही कसरत सांभाळता आली नाही. त्यांनी २१ निर्मात्यांना त्यांचे पैसे परत केले आणि स्वतःचं नाव चित्रपटातून मागे घेतलं. काही वेळानंतर राहुलचे एकापाठी एक चित्रपट प्रदर्शित झाले. ज्यात ‘फिर तेरी याद आई’, ‘जानम’, ‘सपने साजन के’, ‘गुमराह’ आणि ‘मझदार’ हे चित्रपट होते. मात्र यातील एकही चित्रपट बॉक्स ऑफिसवर कमाल दाखवू शकला नाही.

उतरती कळा

उतरती कळा

यातील ३ चित्रपट पूजा भट्टसोबत, २ शिल्पा शेट्टीसोबत, २ करिष्मा कपूर आणि एक श्रीदेवीसोबत होता. त्यानंतर मात्र त्यांच्या करिअरला उतरती कळा लागली. राहुल यांचा एकही सिनेमा हिट ठरला नाही. त्यामुळे त्यांना ऑफर्स येणं बंद झालं. १५ चित्रपटानंतर ते कामाची वाट पाहू लागले. त्यानंतर त्यांनी दिग्दर्शन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी भोजपुरी चित्रपटांचं दिग्दर्शन केलं. मात्र तिथेही त्यांच्या नशिबाने त्यांना साथ दिली नाही.

‘बिग बॉस’चे विजेते

बिग बॉसचे विजेते

आपली ओळख बनवण्याचा प्रयत्न करणाऱ्या राहुल यांनी २००६ साली बिग बॉससारखा शो केला. ते ‘बिग बॉस’ च्या पहिल्याचं सीझनचे पहिले विजेते ठरले. त्यांना प्रेक्षकांचं भरभरून प्रेम मिळालं. मात्र त्याचा त्यांना फारसा उपयोग झाला नाही. ते चित्रपटात पुन्हा पदार्पण करू शकले नाहीत. त्यांनी बॉलिवूडपासून दूर राहणं पसंत केलं आणि राजकारणात आपलं नशीब आजमावलं. त्यांनी २०१७ साली बीजेपी पक्षात प्रवेश केला.

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.