Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

Success Story: शाळेची फी भरण्याचेही पैसे नव्हते, परिस्थितीवर मात करुन बनला ५९.३ अरब डॉलर कंपनीचा सीईओ

9

Success Story: जर तुम्ही मोठी स्वप्ने पाहत असाल आणि ती स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतलात तर तुम्हाला यश नक्कीच मिळते. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीची यशोगाथा सांगणार आहोत. ज्याने मोठी स्वप्न पाहिली आणि ती पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेत यश मिळवले. पुनीत रंजन यांच्या यशाची कहाणी आपण जाणून घेत आहोत. ते डिलॉइट ग्लोबलचे सीईओ आहेत. त्यांनी आयुष्यात खूप संघर्ष पाहिला आहे. याच कारणामुळे त्यांनी हे यश मिळवले आहे, तर जाणून घेऊया त्यांची यशोगाथा.

बालपण गेले गरिबीत

पुनीत रंजन यांचा जन्म हरियाणातील एका छोट्या गावात झाला. पुनीत रंजन यांचे बालपण गरिबीत गेले. पुनीतच्या आई-वडिलांची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती. त्यामुळे त्यांना शाळेची फी भरण्यातही खूप अडचणी येत होत्या. पुनीत रंजनच्या पालकांकडे शाळेची फी भरण्यासाठीही पैसे नव्हते. पुनीतचे शालेय शिक्षण हिमाचल प्रदेशातील सनावर येथील लॉरेन्स स्कूलमधून झाले. त्यानंतर पुनीतने रोहतकमधील स्थानिक महाविद्यालयातून पदवीचे शिक्षण पूर्ण केले.

शिष्यवृत्तीच्या मदतीने अभ्यास

घरची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने पुनीतला नोकरी करणे आवश्यक होते. दरम्यान, पुनीतने एका वर्तमानपत्रात नोकरीची जाहिरात पाहिली. यानंतर पुनीत नोकरीच्या शोधात दिल्लीत आले. यासोबतच त्यांनी पुढील शिक्षण सुरू ठेवले. दरम्यानच्या काळात पुनीतला परदेशात शिकण्यासाठी शिष्यवृत्ती मिळाली. पुनीत दोन जोडी जीन्स आणि काही पैसे घेऊन अमेरिकेला रवाना झाले. तेथून पुनीतने पोस्ट ग्रॅज्युएशन केले. यानंतर डेलॉइटने पुनीतची प्रतिभा ओळखली आणि अखेरीस १९८९ मध्ये पुनीतला डेलॉइटमध्ये नोकरी मिळाली.

Success Story: नैराश्यावर मात करुन तिसऱ्या प्रयत्नात बनला IAS, शिशिरच्या यशाची कहाणी देईल प्रेरणा

पुनीत रंजन बनले डेलॉइटचे सीईओ

पुनीत रंजन यांनी जवळपास ३३ वर्षे डेलॉइटमध्ये काम केले. यानंतर अखेर त्याची मेहनत फळाला आली. डेलॉइटने त्यांना १६ फेब्रुवारी २०१५ रोजी सीईओ बनवले. पुनीत रंजन हे सध्या डेलॉइट ग्लोबल या यूएसस्थित अकाउंटिंग फर्मचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम करत आहेत. Deloitte कंपनी ही भारतात तसेच जगातील १५० हून अधिक देशांमध्ये अस्तित्वात आहे. यामध्ये २ लाखांहून अधिक कर्मचारी काम करतात आणि आज पुनीत रंजन ५९.३ डॉलर बिलियन कंपनीचे सीईओ आहेत.

Success Story: ६ वर्षात सोडल्या १२ सरकारी नोकऱ्या, ऊंटगाडी चालविणाऱ्याचा मुलगा बनला IPS
Success Story: सौंदर्यात भल्याभल्या मॉडेल्सनाही टाकेल मागे, आयएफएस आरुषीने यूपीएससीत मिळविली दुसरी रॅंक

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.