Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
अपघातात मृत्यू पावलेली किर्ती यादव ही दहावीत आहे. तर, तिची मोठी बहिण ममता ही महाविद्याल्यात पहिल्या वर्गात शिकते. या दोघी बहिणी नायगाव येथे राहतात. अपघाताची घटना रविवारी घडली आहे. रविवारी दोघी बहिणी सांतक्रुझ येथे साईबाबा पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. त्यांचा मित्र अक्षय पुजारी याच्यासोबत त्या पालखीत सहभागी झाल्या होत्या. पालखीसोबत घाटकोपर्यंत चालत गेल्यानंतर त्या तिघांनी जेवण करण्याच्या उद्देशाने तिथून बाहेर पडले. त्यानंतर काहीवेळाने रिक्षा पकडून सांताक्रुझ येथे आले.
ममताने दिलेल्या जबाबानुसार, दोघी बहिणींना पुजारी हा बोरीवली स्थानकापर्यंत सोडणार होता. त्यानंतर त्या लोकल ट्रेनने नायगावला जाणार होत्या. मित्राच्या मोटारसायकलवर दोघीही बसल्या. आधी ममता आणि तिच्यामागे किर्ती असे तिघेजण बोरीवलीपर्यंत जायला निघाले होते. तिघांपैकी कोणीही हेल्मेट घातलं नव्हतं.
तिघेही नेस्को मैदानावर पोहोचले असता क्रेनने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. मोटारसायकल भरधाव वेगात असल्याने पुजारीला गाडीवर नियंत्रण मिळवता आलं नाही. तर दुचाकीवरील तिघे फेकले गेले,” असे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दुचाकीवरुन खाली पडल्यानंतर किर्तीला गंभीर इजा झाली होती. त्यानंतर ममता आणि पुजारीने तिला ओढत रस्त्याच्या कोपऱ्यात नेले तसंच, रुग्णालयात नेण्यासाठी मदतही मागत होते मात्र मदतीसाठी कोणीच थांबले नाही. तसंच, क्रेनचा चालकही फरार झाला होता, असं पोलिसांनी म्हटलं आहे.
ममताने पोलिसांच्या आपत्कालीन क्रमांक ‘100’ नंबरवर फोन केला व तत्काळ मदत मागून घेतली कीर्तीला ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तिला मृत घोषित करण्यात आले. ममता व पुजारी यांना किरकोळ दुखापत झाल्याने त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले