Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

पगारवाढ रोखली, डोक्यात तिडीक गेली; मध्यरात्री कॉन्स्टेबलने अधिकाऱ्याला संपवलं

5

ठाणे : नोकरदार वर्गासाठी ‘पगारवाढ’ हा अत्यंत जिव्हाळ्याचा विषय असतो. आता याचं पगारवाढ विषयावरून कल्याण पूर्वेत धक्कादायक प्रकार घडला आहे. पगारवाढ रोखल्यानं आरपीफच्या एका कॉन्स्टेबलने वरिष्ठांची म्हणजेच उपनिरीक्षकाची थेट हत्या केल्याची धक्कादायक घटना कल्याणमध्ये घडली आहे. या घटनेमुळे पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. बसवराज गर्ग असं मृत उपनिरीक्षकाचे नाव आहे. तर पंकज यादव असं आरोपी कॉन्स्टेबलचं नाव आहे.

आरोपी पंकज यादव याची पोस्टिंग पेण आरपीएफ पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या रोहा येथे आहे. तर बसवराज गर्ग हे आरपीएफच्या उपनिरीक्षक पदावर कार्यरत आहेत. त्यांच्या अधिकार क्षेत्रात रोहाचा परिसर येतो. त्यामुळे त्याच्या पगारवाढीची शिफारस करण्यासाठी गर्ग यांच्या परवानगीची आवश्यकता होती.

IND vs AUS: पहिल्या विकेटचा खरा जल्लोष ड्रेसिंग रूममध्ये झाला, द्रविड यांच असं रूप पुन्हा पुन्हा पाहाल
मात्र, पंकज यादवची मागील अनेक दिवसांपासून वेतनवाढ रोखण्यात आली होती. हाच राग मनात ठेवून पंकज यादवने कल्याण रेल्वे यार्डात येऊन गर्ग यांची मध्यरात्री लाकडी दांडक्याने मारहाण करत हत्या केली आणि तेथून पळ काढत रोहा गाठले. याची माहिती पोलिसांना मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी तपास सुरु केला. आरोपी पंकज यादव याला सकाळी अटक करून कोळसेवाडी पोलीस स्थानकात आणलं आहे.

या प्रकरणी, डीसीपी सचिन गुंजाळ यांनी सांगितलं की, पंकज यादव आणि बसवराज गर्ग हे दोघे २०१० साली एकत्र काम करत होते. पंकज यादव याची बसवराज गर्ग यांनी विभागीय चौकशी केली होती. ज्यामध्ये पंकज यादव यांची ४ वर्षांची वेतनवाढ रोखण्यात आली होती. त्यामुळे बसवराज ४ वर्षांपासून गर्गवर चिडले होते. बुधवारी दुपारी ३:३० वाजता पंकज यादव पेणहून कल्याणला आला आणि त्याने १०:४५ च्या सुमारास बसवराज गर्गची यांची हत्या केली.

दरम्यान, आरोपीच्या चौकशीत सहभागी असलेल्या इतर ३ पोलिसांना सुद्धा आरोपीला मारायचे होते. मात्र, त्याला आधीच अटक झाल्याने त्याचा डाव फसला.

विठुरायाचा खजिना चौपटीने वाढला, देवाच्या चरणी कोटींचं दान; पाहा किती वाढ संपत्ती

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.