Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

भुमरेंना मतदारसंघात जात ललकारलं, शिंदे गटाला खोके गँग म्हणत आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

11

औरंगाबाद : पैठण विधानसभा मतदारसंघातील बिडकीनमध्ये शिवसंवाद यात्रेच्या सातव्या टप्प्यात शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांनी सभा घेत राज्य सरकारवर हल्लाबोल केला. “गद्दार गँगच्या पालकमंत्री यांनी धुमाकूळ घातला असताना येथील स्थानिक जनतेने शिवसेनेवर विश्वास दाखवत सरपंच आणि पंचायत समितीला विजय मिळवून दिला. यावरून येथील जनतेने गद्दारांना नाकारल्याचे चित्र स्पष्ट झाले”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. ग्रामपंचायत निवडणुकीत जनतेनं दिलेल्या पाठिंब्याबद्दल शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी पैठणच्या जनतेचे आभार मानले.

एकीकडे घाम गाळणारा शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित आहे तर दुसरीकडे राज्यात एकमेव शेतकरी असे आहेत ज्यांच्या शेतात २ हेलिपॅड आहेत ते म्हणजे मंत्रालायत बसणारे मुख्यमंत्री आहेत, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. “ज्या सुरतमध्ये गद्दार लपून बसले होते, त्या सुरत व गुजरात सरकारचं आभार मानायला यांनी येथील उद्योगधंदे पळवले.”, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

Ind vs Aus 1st Test Live Score: पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाला बसला दणका, १७७ वर ऑलआउट, जडेजाने घेतल्या ५ विकेट
“युवकांचा रोजगार आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई खोके गँगने हिरावली आहे. खोके गँग ही महाराष्ट्रद्वेषी आहे, टक्केवारीत अडकली आहे”, अशी सडकून टीका आदित्य ठाकरे यांनी केली.

पैठण शहरात लावलेले स्पीड ब्रेकर आपलं सरकार आल्यावर सपाट करून टाकू आणि महाराष्ट्राची विकासकामे गतिमान करू,असं आदित्य ठाकरे म्हणाले. निवडणुका लागतील तेव्हा संपूर्ण वातावरण भगवेमय होणार असल्याचा विश्वास आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केला.

“युवकांचा रोजगार आणि शेतकऱ्यांची नुकसान भरपाई खोके गँगनी दिली नाही. हे आव्हान न स्वीकारणारी खोके गँग आहे”, असा आरोप आदित्य ठाकरेंनी केला. “मविआ सरकारच्या काळात आम्ही महाराष्ट्र पुढे नेत राज्याला सुवर्णकाळ दाखवण्याचा प्रयत्न करत असताना राक्षसी महत्त्वाकांक्षी असणाऱ्यांनी सरकार पाडलं”, असा आरोप देखील आदित्य ठाकरेंनी केला.
हिंडेनबर्गने आणखी एक बॉम्ब टाकला; यावेळी अदानींचे काय होणार? संस्थापक म्हणाले…

संविधानावर आमचा पूर्ण विश्वास

न्याय आपल्या बाजूनेच होणार आणि ४० गद्दार हे राजकारणातून हद्दपार होणार आहेत, असं आदित्य ठाकरे म्हणाले. सत्तामेव जयतेला महत्त्व नाही तर सत्यमेव जयतेला शिवसेना महत्त्व देते, असं आदित्य ठाकरे म्हणाले. कृषी आणि उद्योग हे डबल इंजिन आपल्याकडे आहे. मात्र, ओला दुष्काळ जाहीर करा नाही तर खुर्च्या खाली करा या आमच्या मागणीनंतरही सत्ताधारी हे खुर्च्यांना चिकटून राहिले त्यामुळे त्यांना ओला दुष्काळ दिसला नाही, अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. मविआ सरकारच्या काळात मुख्यमंत्रीपदी उद्धव ठाकरे असताना कोणत्याही जाचक अटींशिवाय सरसकट मदत ही शेतकऱ्यांना देण्यात आली होती याची एकदा आठवण आदित्य ठाकरे यांनी शेतकरी बांधवांना करून दिली.

क्रिकेटपटूच्या निधनानंतर ११ महिन्यानंतर समोर आली १२० कोटींची संपत्ती; कोणाला काय मिळणार?

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.