Tej Police Times
Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage

modified guidelines for thane: ठाण्यासाठी करोनाची नवी नियमावली जाहीर; पाहा, कुठे मिळाला दिलासा!

26

हायलाइट्स:

  • ठाणे जिल्ह्यासाठी करोना प्रतिबंधक सुधारित नियमावली जारी.
  • नव्या नियमावलीनुसार ठाणे जिल्ह्यात व्यापारी आणि दुकानदार वर्गाला मोठा दिलासा देण्यात आलेला आहे.
  • मात्र, ठाणे जिल्ह्यातील मॉल्स आणि चित्रपटगृहे बंदच राहणार आहेत.


ठाणे: ठाण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी ठाणे जिल्ह्यासाठी नवी करोना प्रतिबंधक नियमावली जाहीर केली आहे. काल राज्य सरकारने राज्यातील २२ जिल्ह्यांना नियमांत शिथिलता देत ११ जिल्ह्यांमध्ये मात्र निर्बंध कायम ठेवले होते. तर मुंबई, मुंबई उपनगरे आणि ठाणे जिल्ह्यांबाबत निर्णय स्थानिक पातळीवर आढावा घेऊन घेण्याच्या सूचना राज्य सरकारने केली होती. त्यानंतर आज ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी ठाण्यासाठी ही सुधारित नियमावली जाहीर केली आहे. (thane collector issues new modified guidelines for corona)

नव्या नियमावलीनुसार ठाणे जिल्ह्यात व्यापारी आणि दुकानदार वर्गाला मोठा दिलासा देण्यात आलेला आहे. मात्र, ठाणे जिल्ह्यातील मॉल्स आणि चित्रपटगृहे बंदच राहणार आहेत.

क्लिक करा आणि वाचा- पूर, दरड समस्यांवर कायमस्वरुपी उपाययोजना; सरकारने उचलले ‘हे’ महत्वाचे पाऊल

पाहुयात, काय आहे ठाणेकरांसाठी सुधारित नियमावली!

१. अत्यावश्यक सेवेची सर्व दुकाने आठवड्यातील सर्वच दिवस रात्री १० वाजेपर्यंत चालू राहणार.
२. अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने आणि आस्थापना सोमवार ते शनिवार रात्री १० वाजेपर्यंत सुरु राहतील. रविवारी ही दुकाने, आस्थापना बंदच राहणार आहेत.
३. शॉपिंग मॉल्स मात्र पूर्णपणे बंद राहणार आहेत.
४. औषधांची दुकाने (मेडिकल आणि केमिस्ट शॉप्स) सर्व दिवस पूर्ण वेळ सुरु राहणार आहेत.
५. रेस्टॉरंट्स, हॉटेल्स ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील. मात्र त्यांना सोमवार ते शनिवार दुपारी ४ पर्यंतच सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आलेली आहे. रविवारी मात्र रेस्टॉरंट्स आणि हॉटेल्स पूर्णपणे बंद राहतील. पार्सल आणि टेकअवे सुविधा आठवड्यातील सर्व दिवस नियमित वेळेनुसार सुरु असणार आहेत.
६. केशकर्तनाये (सलून), ब्युटी पार्लर्स, स्पा, व्यायामशाळा, योगाचे वर्ग इत्यादी ५० टक्क्यांच्या क्षमतेने (सोमवार ते शनिवार) रात्री १० वाजेपर्यंत सुरू राहतील. रविवारी पूर्णपणे बंदच असतील.
७. जलतरण तलाव आणि जेथे व्यक्तीचा जवळून संपर्क येऊ शकतो असे क्रीडा प्रकार वगळून इतर इनडोअर आणि आऊटडोअर खेळांना संबंधित महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक प्राधिकरण यांनी दिलेल्या वेळेनुसार परवानगी असणार आहे.
८. सार्वजनिक उद्याने, खेळाची मैदाने हे फक्त व्यायाम करणे, चालणे (वॉकिंग), धावणे (रनिंग) आणि सायकलिंग यासाठी सकाळी ५ ते सकाळी ९ वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत.
९. सर्व शासकीय आणि खासगी कार्यालये मात्र १०० टक्के म्हणजेच पूर्ण क्षमतेने सुरु राहतील.
१०. सर्व कृषी विषयक सेवा, औद्योगिक सेवा, बांधकाम उद्योग आणि मालवाहतूक सेवा नेहमीप्रमाणेच चालू राहतील.
११. सर्व सिनेमागृहे, नाट्यगृहे, मल्टिप्लेक्स पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार आहेत.
१२. सर्व प्रकारची धार्मिक स्थळे पुढील आदेश येईपर्यंत बंदच राहणार आहेत.
१३. चित्रीकरण करण्यास मात्र नियमित वेळेनुसार परवानगी देण्यात आलेली आहे.

क्लिक करा आणि वाचा- पूरग्रस्तांसाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय; ११ हजार ५०० कोटींचं पॅकेज जाहीर
क्लिक करा आणि वाचा- पवार-अमित शहा भेट नेमकी कशासाठी?; प्रवीण दरेकर म्हणतात…

Source link

Leave A Reply

Your email address will not be published.