Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
पहिला दावा- वाहिनीचा प्रमुख चेहरा असलेल्या प्रियांकाला समर्थन देणे
‘बिग बॉस तक’ने प्रियांकाला १६ व्या सीझनची विजेती बनवण्याची योजना असल्याचा दावा केला आहे. कलर्स चॅनलच्या पीआर टीमकडून विनंती करण्यात आली आहे की, वाहिनीचे सर्व प्रमुख चेहरे किंवा कलाकारांनी प्रियांकाला विजयी करण्यासाठी जास्तीत जास्त मतांचे आवाहन करावे, असा दावा एका ट्वीटमध्ये करण्यात आला होता. हा दावा सिद्ध झाला आहे.
पुरावा: आघाडीच्या चेहऱ्यांचा पाठिंबा
अर्जुन बिजलानीपासून ते सरगुन मेहता, गौतम गुलाटी आणि रवी दुबे यांसारखे आघाडीचे कलाकार, कलर्स वाहिनीवर काम केलेले इतर अनेक स्टार्स आता प्रियांकाला सपोर्ट करताना दिसतात. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, काही आठवड्यांपूर्वी अर्जुन बिजलानीने शिव ठाकरेला ‘बिग बॉस १६’ साठी सर्वात योग्य असल्याचे म्हटले होते. अर्जुन बिजलानी म्हणाला होता की, शिव ठाकरे ‘बिग बॉस १६’ आधीच जिंकला आहे.
पण आता अर्जुनने पलटी मारत ट्वीट केले की, प्रियांकाच ट्रॉफी घरी घेऊन येईल. इथे ‘घर’ या शब्दाच अर्थ कलर्सचा चेहरा असा होतो. प्रियांकाने कलर्स वाहिनीच्या ‘उडारियां’ शोमध्ये काम केले होते. या शोमधून प्रियांकाला ओळख मिळाली. सरगुन मेहता आणि रवी दुबे हे देखील या शोशी जोडले गेले आहेत. तर अर्जुनने कलर्सच्या अनेक शोमध्ये काम केले आहे.
जय भानुशाली
इतकेच नाही तर ‘बिग बॉस १५’ मध्ये दिसलेल्या जय भानुशालीला यावेळी बिग बॉस कोण जिंकणार असे विचारले असता त्याने टोमणा मारत म्हटले – कलर्सचा चेहरा कोण आहे? जो पहिला असेल त्याला जिंकण्याची अधिक शक्यता असते. तर अर्शी खान आणि गौतम गुलाटीनेदेखील प्रियांका विजेती असल्याचे सांगितले. ‘बिग बॉस’चा भाग राहिलेल्या अर्शीलाही प्रियांकाला विजेतीच्या भूमिकेत पाहायचे आहे. प्रियांकाच ‘बिग बॉस १६’ ची विजेती बनणार असल्याचे ट्वीट तिने केले.
दुसरा दावा- प्रियांका चहर चौधरी कलर्सच्या नवीन रिअॅलिटी शो ‘सिंगिंग दीवाने’मध्ये दिसणार असून तिने या शोची तयारी सुरू केली आहे. मात्र, प्रियांका या शोचे सूत्रसंचालन करणार की गाणार हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण प्रियांकाला ‘बिग बॉस १६’ मध्ये ज्यांनी ज्यांनी गाताना ऐकले आहे ते सोशल मीडियावर तिचे कौतुक करत आहेत.
तिसरा दावा- ‘बिग बॉस १६’ मध्ये नुकतेच काही मीडियाचे सदस्य गेले होते तेव्हा पत्रकारांना अप्रत्यक्षपणे प्रियांका चहर चौधरी आणि एमसी स्टॅनवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास सांगितले गेले. स्टॅनला सकारात्मक दाखवा आणि प्रियांकाला तिखट प्रश्न विचारा. त्यांना लक्ष्य करा. म्हणजेच, निर्मात्यांनी सूचित केले की प्रियांका आणि एमसी स्टॅन टॉप-२ स्पर्धक असणार आहेत. हा दावा ‘बिग बॉस’नेही केला होता आणि तसेच झाले. जेव्हा एपिसोड टेलिकास्ट झाला तेव्हा मीडियाने बहुतेक प्रश्न मंडळींतील सदस्य नसलेल्यांना म्हणजे प्रियांका, अर्चना आणि शालीन यांना विचारले. प्रियांकाला कठीण प्रश्न विचारण्यात आले. तर शिव ठाकरेकडे मात्र दुर्लक्ष केले.
‘बिग बॉस’च्या प्रोमोमध्येच विजेत्याच्या नावाचा पुरावा?
‘बिग बॉस १६’ च्या फिनाले आठवड्यात स्टिंग मोटांजकडूनही असाच इशारा मिळत आहे. जेव्हा ते सुरू होते, तेव्हा प्रियांका ट्रॉफीसह पहिल्या क्रमांकावर, एमसी स्टॅन क्रमांक दोन आणि शिव ठाकरे तिसऱ्या क्रमांकावर दाखवला जातो. यानंतर शालीन आणि अर्चना गौतमचा नंबर लागतो. त्यामुळे ‘बिग बॉस १६’ च्या या फिनाले वीकच्या मॉन्टाजमध्ये विजेते आणि टॉप-२ स्पर्धकांची नावे लपलेली असण्याची शक्यता आहे.
सिद्धार्थ शुक्ला सारखा प्रवास व्हिडिओ आणि एक समान गोष्ट
इतकेच नाही तर निर्मात्यांनी दाखवलेल्या प्रियांका चहर चौधरीच्या जर्नी व्हिडिओमध्ये बिग बॉस एका ठिकाणी असे म्हणताना ऐकायला येते की जेव्हा जेव्हा सीझन १६ ची चर्चा होईल तेव्हा लोकांच्या मनात तुझा आवाज असेल. तेव्हाच प्रियांका १६ व्या सीझनची विजेती असल्याचेही स्पष्ट झाले आहे. कारण जेव्हा ‘बिग बॉस १३’ मध्ये सिद्धार्थ शुक्लाचा जर्नी व्हिडीओ दाखवण्यात आला होता, तेव्हा हा सीझन तुझ्या नावाने ओळखला जाईल असेही सांगण्यात आले होते आणि सिद्धार्थ त्या सीझनचा विजेता ठरला होता.
नेटकऱ्यांचा दावा- प्रियांका ‘बिग बॉस १६’ जिंकेल
सोशल मीडियावर वापरकर्ते असा दावा करत आहेत की प्रियांका चहर चौधरीला ती ‘बिग बॉस १६’ जिंकणार असल्याचे आधीच समजले आहे. तिचा आत्मविश्वास तिच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत आहे. शोच्या एका एपिसोडमध्ये, शिव ठाकरे एमसी स्टॅनशी चर्चा करतानाही दिसले होते की, नॉमिनेशननंतर बेदखल होण्याची भीती प्रियांकाच्या चेहऱ्यावर दिसत नाही. ती खूप आत्मविश्वासू दिसते. दुसरीकडे, ‘बिग बॉस’चे आतापर्यंत जेवढे सीझन आले आहेत.
विशेषत: गेल्या ३ सीझनवर नजर टाकली तर कलर्सचा चेहरा विजेता ठरला आहे. त्यामुळे प्रियांकाला खात्री आहे की तीच विजेती होईल. १३ वा सीझन सिद्धार्थ शुक्लाने जिंकला, त्याच्यासोबत चॅनलने अनेक शो केले होते. त्यानंतर याच वाहिनीच्या ‘शक्ती: अस्तित्व के एहसास की’ या मालिकेची प्रमुख भूमिका केलेल्या रुबिना दिलैकने १४ वा सीझन जिंकला होता. पुढे, १५ वा सीझन तेजस्वी प्रकाशने जिंकला होता, ती ‘खतरों के खिलाडी’ मध्ये दिसली होती आणि आता ती ‘नागिन ६’ हा शो करत आहे.
‘बिग बॉस १६’च्या विजेत्याबाबत राजकीय दबाव?
या सीझनच्या विजेत्याबाबत निर्मात्यांनी वेगळी योजना आखली असल्याचा दावाही केला जात आहे. ‘बिग बॉस १६’ च्या विजेत्यासाठी निर्मात्यांवर राजकीय दबाव आणि प्रादेशिक पक्षांकडून दबाव आणला जात असल्याचा दावा ‘द खबरी’ने केला आहे. त्यामुळे अचानक विजेत्यापदामध्ये काही ट्विस्ट येऊ शकतात.