Tej Police Times, The first and leading Marathi news web portal of Maharashtra, provides the hard core news to Maharashtrians in their own language. It also has a varied programming mix having Politics, Sports, Entertainment news coverage
सिद्धार्थ आनंदनं पठाण सिनेमामधील क्लायमॅक्स सीन कसे केले त्यावर या मुलाखतीमध्ये मोकळेपणानं भाष्य केलं आहे. त्यांनी सांगितलं की, ‘लोकांची आवड, त्यांच्याकडून येणाऱ्या शिट्ट्या, टाळ्या लक्षात घेऊन पठाण सिनेमा केला. याआधी मी केलेला सिनेमा असा नव्हता. तुम्हाला वॉर सिनेमातील कोणताही डायलॉग आठवणार नाही, परंतु पठाण सिनेमा मात्र सर्वांपेक्षा वेगळा आहे. हा कमर्शिअल मास एंटरटेनर बनवला. जेव्हा शाहरुख सावलीतून बाहेर येतो आणि म्हणतो की, ‘जिंदा है हम…’ तेव्हा सेटवरदेखील टाळ्यांचा कडकडाट झाला होता.’
सिद्धार्थने सलमान आणि शाहरुखसोबतच्या कामाच्या अनुभवाबद्दल बोलताना सांगितलं की, ‘त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. त्यांनी सांगितलं होतं की आम्हाला हे करायचेच आहे आणि त्यांनी ते करून दाखवलं. आम्हाला माहिती होतं की सलमान खान टायगरच्या रुपात यावं त्यातून आम्ही क्रॉसओव्हर करू शकू. खरं सांगायचं तर प्रत्येक दिग्दर्शकाला माहिती असतं की त्याच्या सिनेमात त्याला काय करायचं आहे. सिनेमाच्या शेवटी तो क्लायमॅक्समधून ते सांगत असतो. मला मात्र असं व्हायला नको होतं. मला वाटत होतं की, सिनेमाच्या शेवटी नायकाला त्याची खरी जागा मिळेल आणि ती त्यानेच मिळवली हे त्याला माहिती असेल.’
पठाण सिनेमात डिंपल कपाडिया आधी नव्हती
तुम्हाला माहिती आहे का, डिंपल कपाडिया पठाण सिनेमाचा भाग नव्हत्या. त्याबद्दल सिद्धार्थनं सांगितलं की, ‘खरं तर ही भूमिका डिंपल कपाडिया यांच्यासाठी लिहिलेली नव्हती. ती कुमुद मिश्रा यांच्यासाठी लिहिलेली होती, परंतु एका रात्री कुमुद मिश्रा यांच्याशी बोलायला जात होतो तेव्हा मी टेनेट सिनेमा पाहिला. त्यात डिंपल यांनी खूपच सुंदर काम केलं आहे. त्यामुळे या सिनेमातील व्यक्तिरेखा पुरुषा ऐवजी महिलेची केली. कारण शाहरुख आणि महिला हे समीकरण नेहमीच शानदार ठरलं आहे.’